मॅच खेळताना वापरायला लागत होते फाटलेले शूज, स्पॉन्सर्स मिळताच क्रिकेटपटू भावुक

जगभरात एकीकडे कोरोनाचं महासंकट आहे. अशा परिस्थिती आर्थिक संकटांचा सामना अनेक खेळाडू आणि देशही करत आहेत.

Updated: May 24, 2021, 12:18 PM IST
मॅच खेळताना वापरायला लागत होते फाटलेले शूज, स्पॉन्सर्स मिळताच क्रिकेटपटू भावुक title=

हरारे: जगभरात एकीकडे कोरोनाचं महासंकट आहे. अशा परिस्थिती आर्थिक संकटांचा सामना अनेक खेळाडू आणि देशही करत आहेत. एका खेळाडूला अशरक्ष: फाटलेले शूट घालून सराव आणि पुन्हा सामना खेळण्याची वेळ आली आहे. त्याने आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली. या खेळाडूनं आपल्यासह संघाची परिस्थिती सांगितली आणि त्याला मदतीसाठी हात पुढे आला आहे. 

आर्थिक पेचप्रसंगाने हताश झालेल्या झिम्बाब्वेचा फलंदाज रायन बर्लने फाटलेल्या शूजचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून देशाच्या क्रिकेट संघाचे कसे हाल सुरू आहेत याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्याने मदतीसाठी सोशल मीडियावर विनंती केली आणि त्याला प्रतिसादही मिळाला. 

प्यूमा कंपनीने रेयान बर्लला मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्याच्या ट्वीटवर ट्वीट करून प्यूमा कंपनीने मदतीसाठी हात पुढे केला आहे. तर युवराज सिंहने देखील यावर ट्वीट केलं आहे.

प्यूमा कंपनीने ट्वीट करत म्हटलं की आता बूड चिकटवण्याचे दिवस संपले. बूट चिकटवण्याची साधनं आता फेकून देण्याची वेळ आली आहे. आम्ही तुम्हाला मदत करू ज्यामुळे तुम्हाला सतत बूट चिकटवण्याची वेळ येणार नाही. 

27 वर्षाच्या बर्लने झिम्बाब्वेकडून 3 कसोटी, 18 वन डे आणि 25 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने ट्वीटरवर शूट चिकटवण्याचे साहित्या आणि इतर काही अॅक्सिसरीज शेअर केल्या होत्या. त्यानंतर प्यूमाने त्याला मदतीचा हात दिला आहे.