...तर आम्हाला नक्की मेसेज करा; झोमॅटोचं पाकिस्तान टीमसाठी खास ट्विट

वर्ल्डकपमध्ये आज भारत विरूर्ध पाकिस्तान ही लढत रंगणार आहे. 

Updated: Oct 24, 2021, 08:12 AM IST
...तर आम्हाला नक्की मेसेज करा; झोमॅटोचं पाकिस्तान टीमसाठी खास ट्विट

मुंबई : टी-20 वर्ल्डकपमध्ये आज हाय वोल्टेज सामना पहायला मिळणार आहे. वर्ल्डकपमध्ये आज भारत विरूर्ध पाकिस्तान ही लढत रंगणार आहे. सामन्याला अवघे काही तास शिल्लक असून प्रत्येक क्रिकेट प्रेमी या सामन्याची वाट पाहतायत. दोन्ही देशांचे फॅन्स सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोलही करतायत. अशातच फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोही मागे नाहीये. 

नुकतंच झोमॅटोने एक ट्विट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर या ट्विटची भरपूर चर्चा आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमला डिवचणारं हे झोमॅटोचं ट्विट असून अवघ्या काही काळातच याला अनेकांनी रिट्विट आणि लाईक केलं आहे.

“डिअर पाकिस्तान संघ, आज रात्रीसाठी तुम्हाला बर्गर आणि पिझ्झा हवा असेल तर आम्हाला थेट मॅसेज करा”, असं ट्विट झोमॅटोनं केलं आहे. या ट्विटचा संबंध थेट 2019साली झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकपशी जोडलेला आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघातील खेळाडूंनी बर्गर, पिझ्झा खाल्ला होता असा दावा पाकिस्तानच्या एका चाहत्याने केला होता. त्यावेळी या चाहत्याचा व्हीडियो चांगलाच व्हायरल झाला होता.

2019 साली एकदिवसीय वर्ल्डकप भारत पाकिस्तान यांच्यात सामना पाहयला मिळाला होता. यामध्ये भारताने पाकिस्तानचा 89 रन्सने पराभव केला होता. यानंतर या चाहत्याचा व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हीडियोनंतर प्रत्येकाने पाकिस्तानी क्रिकेट टीमवर टीका केली. त्यामुळे आता झोमॅटोच्या या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे.