अण्णा हजारे

अण्णा यापुढे उपोषण करु शकणार नाहीत ?

अण्णा हजारेंना रविवारी पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. अण्णांना प्रचंड थकवा आणि छातीतल्या संसर्गामुळे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. अण्णांचे वयोमान आणि कमी झालेली प्रतिकार शक्ती यामुळे त्यांच्यी उपोषण करण्याची क्षमता संपुष्टात आल्याची शक्यता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. के.एच.संचेती यांनी व्यक्त केली आहे.

Dec 31, 2011, 09:29 PM IST

अण्णागिरी नंतर आता फ्लॅश मॉब

नागपुरात एका नागरी संघटनेने अण्णा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढ्याला समर्पित एका फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपुरातल्या तेलंगखेडी तलाव परिसरात दुपारी ३ ते सांयकाळी ५ वाजपर्यंत हा फ्लॅश मॉब आयोजीत करण्यात आला आहे

Dec 29, 2011, 07:26 PM IST

अण्णा राळेगणसिद्धीकडे रवाना

तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.

Dec 29, 2011, 02:12 PM IST

अण्णा राळेगणसिद्धीत दाखल

दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले. ते दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झालेत. अण्णा तीन दिवस विश्रांती घेणार आहेत. अण्णांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Dec 29, 2011, 02:09 PM IST

अण्णांनी उपोषण सोडले, लढाई मात्र सुरूच!

सशक्त लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी एमएमआरडीए मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी प्रकृती अस्वास्थ आणि संसदेतील विदारक चित्र पाहून बुधवारी सायंकाळी आपले उपोषण सोडले. मात्र, भ्रष्टाचार विरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे अण्णा यांनी स्पष्ट केले.

Dec 28, 2011, 07:44 PM IST

अण्णा करणार ब्रेक… ‘fast’!

संसदेतील विदारक चित्र पाहून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीन दिवस चालणारे उपोषण दोन दिवसांतच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Dec 28, 2011, 05:47 PM IST

लोकपालवर लोकसभेत घमासान

लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. सरकारी लोकपालाबाबत विऱोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या वतीने नारायण सामी हे भूमिका मांडत आहेत.

Dec 27, 2011, 05:45 PM IST

पुढची लढाई 'राईट टू रिकॉल' - अण्णा

लोकपाल विधेयकावर लोकसभेत गरमागर चर्चा सुरू असता ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालाबाबत जोरदार आक्षेप घेतला. यावेळी केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली. आता पुढची लढाई 'राईट टू रिकॉल' ची असेल असे अण्णा यांनी मुंबईत जाहीर केले. सरकारविरोधात एकत्र लढण्यासाठी अण्णांनी रामदेवबाबांना हाक दिली आहे. तर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Dec 27, 2011, 05:44 PM IST

लोकपालसाठी मुंबई अण्णामय

अण्णांना समर्थन देण्यासाठी रणमैदानावर देशाच्या कानाकोप-यातून लोक जमा होतायत. यामध्ये बच्चे कंपनीही मागे नाही. जुहूतून महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरूवात झाली. जुहूतून अण्णा हजारे यांची ट्रकमधून रॅली सुरू झाल्यानंतर प्रचंड जनसमुदाय जमला होता.

Dec 27, 2011, 04:40 PM IST

'तर अण्णांवर कारवाई करु'- सरंगी

अण्णांच्या आंदोलनासाठी प्रशासनानेही कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे. आंदोनावरून टीम अण्णांना राज्य सरकारने चांगलाच दम दिला. काही प्रक्षोभक विधानं केल्यास अण्णांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहसचिव उमेशचंद्र सारंगी यांनी दिली.

Dec 26, 2011, 09:50 PM IST

मुख्यमंत्र्यांचा अण्णांवर हल्लाबोल

अण्णा हजारेंच्या आंदोलनावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आसूड ओढले आहेत. देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे अस्थिरता माजेल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अण्णा हजारे उद्यापासून तीन दिवस मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.

Dec 26, 2011, 05:16 PM IST

आंदोलन कुठल्याही पक्षा विरोधात नाही – अण्णा

आंदोलन कुठल्याही पक्ष, व्यक्ती विरोधात नाही. तर भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन आहे. आज भ्रष्टाचाराने देशात थैमान घातले आहे. सामान्य माणसाला जीवन जगण कठीण झाले आहे, त्यामुळे आता मुंबईतील तीन दिवसांच्या आंदोलनानंतर दिल्लीत सोनिया गांधींच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे स्पष्ट केले.

Dec 26, 2011, 04:53 PM IST

'जनलोकपाल'साठी अण्णांचे हाल

अण्णा हजारे आज मुंबईत येणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचं उद्यापासून मुंबईत उपोषण होत आहे. मात्र, मुंबईत येण्यापूर्वी अण्णा आळंदीला जाणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.

Dec 26, 2011, 11:22 AM IST

सरकारला समजणाऱ्या भाषेत उत्तर देणार - अण्णा

गेल्या एका वर्षापासून आंदोलन सुरू आहे. आपल्या आंदोलनाला सरकार दाद देत नाही. सरकारला समजेल त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनानंतर आता दिल्ली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे सांगितले.

Dec 25, 2011, 09:43 PM IST

अण्णांची प्रकृती बिघडली

उत्तरेत कडाक्याची थंडी पडल्यामुळे अण्णांच्या प्रकृतीचा विचार करून मुंबईमध्ये उपोषण करण्याचं ठरवण्यात आलं. परंतु, महाराष्ट्रातही हवामान बदललं आहे आणि थंडी वाढली आहे. यामुळे अण्णांची तब्बेत बिघडली आहे.

Dec 24, 2011, 10:25 PM IST