जनतेच्या हितासाठी राजकारणात - अण्णा हजारे
जनता म्हणत असेल तर राजकारणाचा विचार केला जाईल. याबाबत माझी काही हरकत नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Jul 27, 2012, 12:17 PM IST'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!
अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय.
Jul 26, 2012, 08:47 PM IST'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.
Jul 26, 2012, 11:03 AM ISTअण्णांच्या सहकाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन; पैसा येतो कुठून?
एका बाजुला टीम अण्णांच्या जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनामुळं देशातलं वातावरण ढवळून निघण्याची चिन्ह असतानाच दुसऱ्या बाजुला ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमुळं खळबळ उडालीय. अण्णांच्या आंदोलनाला येणारा पैसा हा नेमका कुठल्या मार्गाने येतो, याची माहिती अण्णांच्या सहकाऱ्यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये केल्याचा दावा ‘द वीक’ने केलाय.
Jul 25, 2012, 07:57 AM ISTअण्णांचं सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम
15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. तोपर्यंत मागणी पूर्ण झाली नाहीत, तर अण्णाही उपोषणाला बसणार आहेत.
Jul 24, 2012, 07:00 PM ISTअण्णा दिल्लीकडे रवाना
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर टीम अण्णा पुन्हा आक्रमक झालीय. उद्यापासून टीम अण्णांचं जंतरमंतरवरच्या नियोजित आंदोलनाला सुरूवात होणार आहे. यासाठी आज सकाळीच अण्णा दिल्लीकडे रवाना झालेत.
Jul 24, 2012, 04:02 PM ISTअण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेट
अण्णा हजारेंनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर गुप्त भेट झाल्याचं मान्य केलंय. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय. पारदर्शकतेचा आग्रह धरणा-या अण्णांच्या गुप्त भेटी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.
Jul 18, 2012, 11:03 PM ISTमी देशद्रोही.. तर तुरुंगात टाका - अण्णा
टीम अण्णाच्या आंदोलनामागे परदेशी शक्ती असल्याच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आरोपाला आज अण्णांनी उत्तर दिलय. आंदोलनामागे परदेशी शक्ती असतील, तर त्याचे पुरावे द्या, असा पलटवार अण्णांनी केलाय. आपण जर देशद्रोही आहे, असं सरकारला वाटतं असेल, तर सरकारने तुरुंगात टाकावे असं आव्हान अण्णांनी दिले आहे.
Jun 12, 2012, 10:19 PM ISTअण्णांच्या संघटनांमध्ये मतभेद
भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन देशात परिवर्तन घडवण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठं जनआंदोलन उभं केलं. मात्र या आंदोलनात देशात परिवर्तन होण्याआधी आंदोलनाच्या मंचावर परिवर्तन झालेलं दिसलं.
Jun 6, 2012, 10:12 AM ISTअण्णांकडून पुन्हा पीएम टार्गेट
केंद्र सरकार विरोधात टीम अण्णा आणि बाबा रामदेव असा संघर्ष पहायला मिळणार आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी सरकारवर केलेले आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळलेत. त्यानंतर आज अण्णांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jun 4, 2012, 08:24 PM IST'भ्रष्टाचाराविरोधात सचिन फटकेबाजी कर'
सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याचं अभिनंदन केलंय. भ्रष्टाचाराविरोधात सचिननं संसदेत फटकेबाजी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, आम्ही संसदेबाहेरुन पाठिंबा देऊ, अशी ग्वाही अण्णांनी यावेळी दिली आहे.
Jun 4, 2012, 07:46 PM ISTअण्णा-बाबांचं जंतरमंतरवर उपोषण सुरू
योगगुरू बाबा रामदेव आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत. बाबा रामदेवांना पाठिंबा देत अण्णा हजारे जंतरमंतरवर होणाऱ्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाच्या ठिकाणी हजर होणार आहेत.
Jun 4, 2012, 03:17 PM IST'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग
भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.
Jun 1, 2012, 04:51 PM ISTकेजरीवाल यांच्याविरोधात नाही - किरण बेदी
टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात किरण बेदींनी अण्णांना लिहलेल्या पत्राबाबत किरण बेदींनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण असं कोणतही पत्र अण्णांना लिहलं नसल्याचं बेदींनी म्हंटलं आहे.
May 26, 2012, 05:45 PM ISTअण्णांवरील हल्ल्याचे राऊतांकडून समर्थन!
नागपुरात अण्णांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. यात अण्णा हजारे विरुद्ध नितीन राऊत असा नवा संघर्ष पेटलाय. काल रात्री जेव्हा ताफ्यातल्या गाडीवर हल्ला झाला, त्यावेळी रोहयो मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत त्याठिकाणी उपस्थित होते.
May 17, 2012, 06:49 PM IST