स्वामींची 'अग्नि'परीक्षा, अण्णांकडून माफी की शिक्षा ?
स्वामी अग्निवेश यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय. स्वामी अग्निवेश यांनी अण्णांची माफी मागितली आहे. त्यावर अण्णांनी प्रतिक्रिया दिली आहे. अग्निवेश यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचं अण्णांनी म्हटलंय.
Nov 12, 2011, 07:11 AM ISTसंघाशी संघटन नाही- अण्णा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला काहीही संबंध नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलंय. अण्णा संघाच्या कार्यक्रमाला हजर राहत असल्याचं वक्तव्य काल कोलकत्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावर अण्णांनी हे स्पष्टीकरण दिलंय.
Nov 10, 2011, 12:21 PM ISTपुणे महापालिका करणार अण्णांचा सत्कार
पुणे महापालिका अण्णा हजारे यांचा सत्कार करणार आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी सर्व पुणेकरांच्या वतीनं हा नागरी सत्कार केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेतल्या सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे.
Nov 9, 2011, 11:03 AM ISTअण्णांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
लवासा प्रकरणी अण्णांनी मुख्यमंत्र्यांवरच ताशेरे ओढलेत. लवासा प्रकरणी मुख्यमंत्री दुटप्पी भूमिका कसे काय घेऊ शकतात, असा खडा सवाल केला अण्णांनी. यासंदर्भात अण्णांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये लवासा नियमित कसं काय करता येऊ शकतं, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
Nov 8, 2011, 02:09 PM ISTकोअर कमिटीत बदलाचे अण्णांचे संकेत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लवकरच कोअर कमिटीची पुनर्रचना करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेली कोअर कमिटी फक्त अडीच महिन्यांसाठी होती, असे सांगून त्यांनी त्यात बदल अपेक्षीत असल्याचं म्हटलं आहे.
Nov 7, 2011, 10:32 AM ISTटीम अण्णांचे फोन टॅप - केजरीवाल
टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी तागपूर येथे केलाय.
Nov 6, 2011, 06:58 AM ISTफोन टॅप होत असल्याचा अण्णांचा खळबळजनक आरोप
टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचे खळबळजनक आरोप केलाय.जनलोकपालाच्या मुद्यावर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अण्णांना सोशल नेटवर्किंग साईटद्वारे जगभरातल्या तरुणांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळं तरुण पिढीशी नाळ जोडण्यासाठी अण्णांना ब्लॉग महत्त्वाचा आहे.
Nov 6, 2011, 05:45 AM ISTअण्णांनी दाखविला अविश्वास- राजू परुळेकर
अण्णांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत माझ्यावर अविश्वास दाखवल्यामुळे मी नाराज झाल्याची प्रतिक्रिया लेखक, पत्रकार राजू परुळेकर यांनी ब्लॉगवर व्यक्त केल्याचे समजते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी दिल्लीत राजघाटावर मौन सोडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता.
Nov 5, 2011, 09:55 AM ISTभ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच - अण्णा
लोकपाल कायद्याचे तुकडे करत असल्याने सशक्त जनलोकपाल आणण्यासाठी आंदोलन सुरूच राहील, असं अण्णा हजारेंनी आज पहिल्यांदाच संवाद साधताना सांगितलं.
Nov 4, 2011, 10:25 AM ISTअण्णा उद्या दिल्लीत
अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.
Nov 3, 2011, 05:59 AM ISTअण्णांचा काँग्रेसविरोध मावळला!
हिसारमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचार करण्यावरून झालेले मतभेद आणि टीकेनंतर अण्णा हजारेंनी पाच राज्यात होणा-या अगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचं नाव न घेता प्रचार करण्याचं ठरवलंय.
Nov 1, 2011, 09:23 AM ISTअण्णांचं सरकारला अल्टिमेटम
येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. अण्णांनी पंतप्रधानांना या अर्थाचे पत्र लिहून त्यांना अल्टिमेटम दिलं आहे.
Nov 1, 2011, 05:45 AM ISTअण्णा मौनव्रत सोडणार
ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून सुरू केले मौनव्रत सोडणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.
Oct 31, 2011, 11:40 AM ISTटीम अण्णा राळेगणसिद्धीत
टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण यांनी राळेगणसिद्धीत अण्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझियाबादमध्ये झालेल्या बैठकीचा व़ृत्तांतही अण्णांना सांगितला. हे सदस्य थोड्याच वेळापूर्वी राळेगणसिद्धीत दाखल झाले.
Oct 30, 2011, 09:43 AM IST