अतिरेकी हल्ला

शोफियामध्ये अतिरेक्यांचे लष्करी जवानांवर हल्ले सुरुच

काश्मीरमध्ये शोफिया भागात लष्कर आणि CRPFनं मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात दडून बसलेले अतिरेकी लष्करी जवानांवर सातत्यानं हल्ले करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.

May 4, 2017, 10:52 PM IST

भारतीय दूतावासाजवळ स्वीडन येथे अतिरेकी हल्ला, तिघांचा बळी

स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झालाय. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आलाय. यामध्ये किमान तिघांचा बळी गेलाय. 

Apr 7, 2017, 11:13 PM IST

स्वीडनमध्ये भारतीय दूतावासाजवळ अतिरेकी हल्ला

 स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झाला आहे. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आला आहे. यामध्ये किमान दोघांचा बळी गेला आहे. हा अतिरेकी हल्लाच असल्याचं स्वीडिश पंतप्रधान स्टीफन लोवेन यांनी स्पष्ट केलं आहे.

Apr 7, 2017, 09:59 PM IST

भिकारी वेशात राज्यात दहशतवादी हल्ल्याचा धोका

दहशतवादी हल्ल्याचा धोका, भिकारी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या वेशात दहशतवाद्यांकडून रेल्वे स्थानक आणि रुळ परिसरात घातपात घडविण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे.

Mar 23, 2017, 08:42 AM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशात कडेकोट बंदोबस्त

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत होणा-या कार्यक्रमावर लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Jan 26, 2017, 07:43 AM IST

नागरोटामध्ये दहशतवादी हल्ला; तिघांचा खात्मा, दोन जवान शहीद

भारतीय लष्करी तळावर नागरोटामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन जवान शहीद झालेत. दरम्यान, जवानाने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले. अतिरेकी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरुच आहे.

Nov 29, 2016, 10:50 AM IST

मुंबईत गणेश विसर्जनाच्यावेळी फ्रान्सप्रमाणे ट्रक हल्ला होण्याची भीती

पोलिसांनी उद्याच्या गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एक खबरदारीचा अलर्ट जारी केला आहे. फ्रान्सप्रमाणे ट्रक हल्ला होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Sep 14, 2016, 11:54 PM IST

पाक क्रिकेट बोर्डाची गयावया, 'बुलेटप्रूफ' गाड्या देतो; पण खेळा!

  पाक क्रिकेट बोर्डाने अन्य देशातील खेळाडूंनी खेळावे यासाठी चक्क 'बुलेटप्रूफ' गाड्या खरेदी केल्यात.  

Jul 15, 2016, 05:18 PM IST

बांग्लादेशात दहशतवादी हल्ला आणि त्याचा भारतावर परिणाम

मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे. 

Jul 8, 2016, 11:26 PM IST

ढाका हल्ला : १३ ओलिसांची सुटका, ५ अतिरेक्यांना मारण्यात यश

बांग्लादेशाची राजधानी ढाका अतिरेकी हल्ल्याने हादरली. ६० ओलीस ठवलेल्या नागरिकांची ढाक्यातील पोलिसांनी १३ ओलिसांची सुटका केली आहे. तर पाच अतिरेक्यांना मारण्यात यश आले असून एका अतिरेक्याला जिवंत पकडले आहे. तर ३६ जखमींवर उपचार सुरु आहे.

Jul 2, 2016, 10:12 AM IST

समुद्रामार्गे देशात पुन्हा २६/११चा अतिरेकी हल्ला, १८० बंदरे आणि बेट टार्गेट

नापाक कारवाईबरोबर देशात पुन्हा २६/११सारखा अतिरेकी हल्ला समुद्रामार्गे होण्याची शक्यता आहे. देशातील १८०  छोटी बंदरे आणि बेटे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहेत.

Jun 17, 2016, 06:50 PM IST

सोमनाथ मंदिरावरील अतिरेकी हल्ला उधळला, १० पैकी ३ पाक दशहतवाद्यांचा खात्मा

देशात महाशिवरात्री उत्सावादरम्यान सोमनाथ मंदिरासह अनेक मंदिरांवर हल्ला करण्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावलाय. पाकिस्तानच्या १० पैकी ३ दहशतवाद्यांचा भारतात प्रवेश करताना गुजरात सिमेबाहेर खात्मा करण्यात आला, अशी माहिती आज उघड झालेय.

Mar 15, 2016, 07:08 PM IST

पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोत अतिरेकी हल्ला, २० ठार

पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो  दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २० लोक ठार झालेत.

Jan 16, 2016, 12:43 PM IST