अपहरण

मलेशियाच्या `त्या` विमानाचं अपहरण - वृत्तसंस्था

गेल्या आठ दिवसांपासून गायब असलेलं मलेशिया एअरलाईन्सचं `एमएच३७०` या विमानाचं अपहरण झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. या विमानात २३९ प्रवासी आहेत.

Mar 15, 2014, 10:43 AM IST

निपुत्रिक दाम्पत्याने केले ६ महिन्यांच्या बाळाचं अपहरण

मागितल्यावरही दत्तक दिलं नाही म्हणून एका निपुत्रिक दाम्पत्याने ६ महिन्याच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना नागपूरमध्ये घडलीय. या प्रकरणातील आरोपी दांपत्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. पण आरोपी दाम्पत्य वारंवार आपलं ठिकाण बदलत असल्यानं पोलिसांना अजूनपर्यंत निराशाच हाती आलीय. महत्वाचं म्हणजे घात करणारा व्यक्ती बाळाच्या वडिलांचा चांगला मित्र आणि शेजारी आहे.

Feb 5, 2014, 09:53 PM IST

नातवानंच केलं आजीचं अपहरण

नायजेरियात एक धक्कादायक प्रकार घडलाय. अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने स्वत:च्याच आजीचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Feb 4, 2014, 03:13 PM IST

लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीला केलं न्यूड

प्रेम म्हणजे एकमेकांचा विचार करणं... पण याच प्रेमाचं सध्या विकृत रूप पाहायला मिळतंय. लग्नासाठी प्रेयसीनं नकार दिला म्हणून एका विकृत प्रियकरानं तिचं अपहरण करून बंदी बनवलं.

Jan 24, 2014, 12:24 PM IST

दहा लाखासाठी चिमुरड्याचं अपहरण, पण...

पुण्यातील मुंढवा येथे पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा कट मोठ्या बहिणीच्या आणि आजुबाजुला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला.

Jan 7, 2014, 04:22 PM IST

अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण..बलात्कारानंतर गाडीतून फेकून दिले, पुढे...

धक्कादायक. चंद्रपुरात अपहण करून आपल्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आपल्याला चालत्या गाडीतून फेकून देण्यात आले, अशी तक्रार पिडीत शाळकरी मुलीने पोलिसांना दिली. तपासाची चक्रे फिरलीत. मात्र, पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी डोक्याला हात मारले. याबाबत तसा पोलिसांनी खुलासा केलाय.

Dec 21, 2013, 06:35 PM IST

दहा वर्षाच्या चिमुरडीचं शौर्य, अपहरण हाणून पाडलं

मुंबई महिलांसाठी किती असुरक्षित आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुंबईतल्या डोंगरी परिसरातून सकाळी सातच्या सुमारास एका शाळकरी मुलीचं अपहरण करण्यात आलं. मात्र या धाडसी मुलीनं प्रसंगवधान राखत स्वता:ची सुटका तर केलीच शिवाय मोठ्या शिताफीनं त्या अपहरणकर्त्यांना पकडूनही दिलं.

Dec 21, 2013, 03:38 PM IST

भरदिवसा शाळकरी मुलीचं अपहरण आणि विनयभंग

चंद्रपूर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका अल्पवयीन शाळकरी मुलीचं शाळेसमोरूनच एका वाहनातून पाच तरुणांनी अपहरण केलं आणि तिचा चालत्या गाडीतच विनयभंग करत तिला चंद्रपूर-नागपूर महामार्गावरच्या भद्रावती शहराजवळच्या एका मंदिराजवळ गाडीतून फेकून दिलं.

Dec 19, 2013, 11:54 AM IST

नाशिककरांनो, डोळ्यांत तेल घालून मुलांची काळजी घ्या!

नाशिकमधल्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... शहरात गेल्या आठ दिवसांमध्ये पाच लहान मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झालाय. यामधल्या दोन मुलांनी प्रसंगावधान दाखवून आपली सुटका करुन घेतली...

Dec 2, 2013, 09:40 PM IST

संतांच्या माहेरघरातून दोन मुलींचं अपहरण!

पंढरपूरमधील नवरंगे बालकाश्रमातून नऊ आणि बारा वर्षांच्या दोन मुली गायब असल्याचं उघड झालंय.

Nov 27, 2013, 07:33 PM IST

योगगुरू रामदेव बाबांच्या भावावर अपहरणाचा गुन्हा

सरकार लोकशाहीची थट्टा उडवत आहे. भाऊ राम भरतवर गुन्हा दाखल झाल्यानं योगगुरू रामदेव बाबांनी सरकारवर नव्यानं हल्लाबोल केला आहे. योगगुरू रामदेव बाबा यांचा भाऊ राम भरत याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Oct 22, 2013, 02:01 PM IST

अपहरण केलेल्या लिबिया पंतप्रधानांची नाट्यमय सुटका

लिबियाचे पंतप्रधान अली झेदान यांचं काही अतिरेक्यांनी त्रिपोली येथील एका हॉटेलमधून अपहरण करण्यात आलं. मात्र काही तासांनंतरच नाट्यमय रित्या त्यांची सुटकाही करण्यात आली.

Oct 11, 2013, 03:51 PM IST

लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं हॉटेलमधून अपहरण

लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं अपहरण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात शस्त्रधारी लोकांनी त्रिपोलीतील एका हॉटेलमधून पंतप्रधानांचं अपहरण केलं. अली झिदान नुकतेच लिबियाच्या पंतप्रधानपदी निवडले गेले होते.

Oct 10, 2013, 11:20 AM IST

अपहरण आणि हत्येच्या फरार आरोपीला अटक

पुण्यातल्या रुपाली चव्हाण अपहरण आणि हत्या प्रकरणातला आरोपी हनुमंत ननवरे तब्बल चार वर्षांनी पोलिसांच्या तावडीत सापडलाय.

Sep 17, 2013, 09:17 PM IST

शाळकरी मुलींचं `अपहरण`नव्हे, तर `आशिकी-२`!

अभिनेत्री बनण्यासाठी घरातून पळून जाणा-या तरुणीची कथा तुम्ही अनेक चित्रपटातून बघितली असेल. पण जेव्हा ही कथा वास्तवात घडते तेव्हा काय होतं याचा अनुभव औरंगाबादच्या रेल्वे पोलीसांनी घेतलाय.

Sep 2, 2013, 07:09 PM IST