अपहरण

मुलीचे झाले लग्न, आई मात्र अनभिज्ञ!

नवी दिल्लीच्या एअरपोर्टवर काम करणाऱ्या तरुणीच्या अपहरणाचे प्रकरण आता मिटले आहे. तिचा शोध आता लागला आहे. पोलिसांनी लावलेल्या तपासात असे शोधून काढले की, ती मुलगी अल्पवयीन नसून २३ वर्षाची आहे आणि तिचे लग्न झालेले आहे हे तपासात उघडकीस आले.

Aug 7, 2013, 06:53 PM IST

२४ भारतीयांसह चाच्यांकडून जहाजाचे अपहरण

पश्चिम आफ्रिकेच्या गॅबन या तटाजवळ समुद्री चाच्यांकडून तेलवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आलंय. या जहाजात २४ भारतीय खलाशी असल्याची अशी माहिती सूत्रांनी दिली.

Jul 17, 2013, 07:04 PM IST

अपहरण, रेप आणि खून करणाऱ्या दोघांना फाशीची शिक्षा!

एका १९ वर्षाच्या युवतीचे अपहरण, रेप आणि खून करण्याच्या आरोपाखाली २ आरोपींना नागपूरच्या सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावली. अमर सिंह ठाकूर आणि राकेश कांबळे ही या प्रकरणातील आरोपींची नावे असून नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील लोणार गावात ही घटना घडली होती.

Jun 28, 2013, 07:08 PM IST

मुलीचं अपहरण आणि बलात्कार करून MMS बनवला!

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंडका भागातील एका २१ वर्षीय मुलीचं अपहरण करून मुलाने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

Jun 6, 2013, 04:45 PM IST

अपहरण झालेल्या सपनाचा नरबळीच!

गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील ८ आरोपींनी दिली आहे.

May 29, 2013, 08:33 PM IST

अभिनेत्री सना खान फरार, मुलीचे केलं अपहरण

अभिनेत्री सना खान हिच्याविरोधात एका १५ वर्षाच्या मुलीचं अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 24, 2013, 12:07 PM IST

पाकच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाचे अपहरण

माजी पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. अली हैदर गिलानी असं त्याचं नाव आहे. तो पंजाब प्रांतातून निवडणुकीसाठी उभा होता.

May 9, 2013, 03:27 PM IST

हिंदू मुलीचं अपहरण करून धर्मांतर, हिंदूंचं संतप्त आंदोलन

पाकिस्तानातील सिंधमध्ये एका हिंदू युवतीचं धर्मांतर करून तिला मुस्लिम केल्याबद्दल आणि तिचा मुस्लिम तरूणाशी विवाह लावून दिल्याबद्दल तेथील अल्पसंख्यांक हिंदूंनी जोरदार आंदोलन केलं आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, की हिंदू तरुणीचं अपहरण करून तिला जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आलं आहे.

Mar 31, 2013, 04:28 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ

एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं अपहरण करुन 19 दिवस तिचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेजोगाईत उघडकीस आलं आहे.

Mar 18, 2013, 10:20 PM IST

आदिवासी मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात खरीवली इथं एका चौदा वर्षीय आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

Jan 31, 2013, 12:36 PM IST

आश्रमशाळेतील विद्यार्थीनीवर गँगरेप

नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यातल्या पळसाणा आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

Dec 27, 2012, 12:38 PM IST

पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीचे अपहरण

इस्लातमाबाद- पाकिस्ताकनात एका अल्प वयीन हिंदू मुलीचे अपहरण केल्याढच्यार घटनेने खळबळ उडाली आहे. सिंध प्रांतात ही घटना घडली असून स्थाअनिक अल्पतसंख्यां क समुदायामध्ये चिंता वाढली आहे.

Aug 9, 2012, 05:46 PM IST

मराठवाड्यात अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय?

परभणी रेल्वे स्टेशनवरून दोन मुलांना पळवण्याचा प्रयत्न करणा-या भामट्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. वसईच्या रेल्वे स्टेशनवरून सहा जणांनी शेख अझीम आणि जितेंद्र प्रजापती या मुंबईतल्या कोळीवाड्यात राहणा-या दोन मुलांचं अपहरण केलं.

Jul 12, 2012, 04:23 PM IST

अपहरण केलेल्या सरपंचांची हत्या

इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या सरपंचाचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला.

May 10, 2012, 09:21 AM IST

नक्षलवाद्यांनी केलं सरपंचाचं अपहरण

गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र अजून त्यांचा तपास लागलेला नाही.

May 9, 2012, 07:45 PM IST