इंदू मिल

इंदू मिलसाठी आठवले आक्रमक, सरकारची धावपळ

6 डिसेंबरपर्यंत इंदू मिलची जमीन ताब्यात द्या अन्यथा इंदू मिलचा ताबा घेऊ असा इशारा आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी दिलाय. त्याचे जे परिणाम होतील त्याला सरकार जबाबदार राहील असा इशाराही आठवले यांनी दिलाय.

Dec 3, 2012, 10:04 PM IST

'इंदूमिलवर बाळासाहेबांचं स्मारक... ही मनसेची भूमिका नव्हे'

बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलवर उभारलं जावं, ही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नसून ती संदीप देशपांडे यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं स्पष्टीकरण मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी दिलंय.

Nov 23, 2012, 08:37 PM IST

बाळासाहेबांचं स्मारक इंदूमिलमध्ये - मनसेची भूमिका

मनसेनं वेगळा पवित्रा घेत बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये उभारलं जावं अशी मागणी केलीय.

Nov 22, 2012, 07:47 PM IST

इंदू मिलप्रकरणी तावडे, आठवले पोलिसांच्या ताब्यात

इंदू मिलच्या जागेसाठी आंदोलन करणारे भाजप नेते विनोद तावडे आणि रिपाई नेते रामदास आठवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय. इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं तसंच इंदूमिलची जागा स्मारकासाठी मिळावी यासाठी हे आंदोलन सुरू होतं.

Oct 15, 2012, 06:46 PM IST

`राज, इंदू मिल मागतोय, कोहिनूर मिल नाही!`

महायुतीत मनसे आल्यास, इतरांना वाटतो तितका फायदा होणार नाही, असं वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केलंय. मनसेला सध्या जेवढी मते मिळतात, तितकी मते महायुतीत आल्यावर त्यांना मिळणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच इंदू मिलची जागा मागतोय कोहिनूर मिलची नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

Aug 24, 2012, 07:58 PM IST

अंबेडकर स्मारकावरून वाद सुरूच

इंदू मिल परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विलंब लागत असल्याचा आरोप करत रिपब्लीकन सेनेनं आंदोलन केलं होतं. रिपब्लिकन स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचं जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला होता.

Apr 14, 2012, 09:15 PM IST

आंबेडकर स्मारकासाठी RPIने रेल्वे रोखली

इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Mar 17, 2012, 08:30 PM IST

मंत्रालयात 'जय भीम'चा जागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात घुसून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली.

Feb 27, 2012, 07:06 PM IST

'इंदू मिलचा प्रश्न सोडवा'- आठवले

इंदू मिलचा प्रश्न गेले काही दिवस चागंलाच पेटला आहे. आंबेडकर स्मारकासाठी संपूर्ण जमिनीची मागणी ही करण्यात आली आहे. त्याला कालच तत्वत: मान्यता देण्यात आली आहे . इंदू मिलच्या जागेसंदर्भात पंतप्रधानांनी २६ जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Jan 2, 2012, 03:46 PM IST

‎'इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढा'

इंदू मिल कब्जा प्रकरणी हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत. इंदू मिलमधून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

Dec 22, 2011, 08:01 AM IST

इंदू मिलवर अतिक्रमण, राज्य सरकारला फटकारले

आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी हायकोर्टाने तीव्र शब्दांत राज्य सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Dec 20, 2011, 07:10 AM IST

आरपीआयचा 'राडा', इंदू मिलवर फिरवणार 'गाडा'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादरमधल्या इंदूमिलची केवळ ४ एकर जागा देण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविरोधात आज रिपब्लिकन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

Dec 15, 2011, 11:28 AM IST

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी ४ एकर जागा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दादरमधल्या इंदू मिलची साडे बारा एकर जागा देण्याची मागणी होत असताना राज्य सरकारनं ४ एकर जागेचीच मागणी केल्याची माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री पनाबाका लक्ष्मी यांनी राज्यसभेत दिली.

Dec 15, 2011, 10:26 AM IST

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलवर चढाई

स्मारकाच्या मागणीला राजकारण्यांनी वाटाण्याच्या अक्षता दिल्यानंतर अखेर आंदोलकांनी आज इंदू मिलवर जोरदार चढाई केली.

Dec 6, 2011, 12:11 PM IST

उद्या इंदू मिलमध्ये 'रिपाइं'चं आंदोलन

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

दादरमधल्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांचं स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी यासाठी ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे. इंदू मिलच्या जागेवर हे आंदोलन केलं जाईल.

 

Dec 5, 2011, 03:24 AM IST