इस्लामाबादेत पी-टीव्ही कार्यालयात आंदोलनकर्ते घुसले
सरकार विरोधात प्रदर्शन करणारे आंदोलक आता पाकिस्तानचं सरकारी चॅनेल, पी टीव्ही कार्यालयात घुसले आहेत. आंदोलकांनी पी-टीव्हीचं प्रसारण बंद केलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
Sep 1, 2014, 01:35 PM ISTपाकिस्तान हिंसा: प्रदर्शनकर्ते संसदेत, 8 ठार, 450हून अधिक जखमी
गेल्या दोन आठवडय़ापासून संसद परिसरात धरणे देणाऱ्या इम्रान खान आणि ताहीर ऊल कादरी यांच्या हजारो समर्थकांनी हातात लाठ्या घेत आणि कठडे तोडत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानाकडे चाल केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत केलेल्या गोळीबारात 8 निदर्शक ठार झाले, तर 450हून अधिक निदर्शक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये २५ पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती पाकिस्तानातील वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारनं संघर्षात्मक पवित्र घेत या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
Aug 31, 2014, 04:37 PM IST३६ मुलांचा बाप आणि अपुरी इच्छा
पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात पाक सेनेने मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. या नागरिकांना आपले घर सोडून जावे लागत असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घर सोडून जाणाऱ्या या हजारो लोकांमध्ये ५४ वर्षांच्या गुलजार खान यांचाही समावेश आहे. त्यांना घर सोडून जाण्याचे दुःख कमी आहे पण आपली एक इच्छा अपूर्ण राहिल्याचा खेद व्यक्त वाटतो आहे. ही इच्छा म्हणजे चौथा निकाह करण्याची...
Jul 17, 2014, 08:10 PM ISTइस्लामाबाद सर्वात धोकादायक शहर
पेराल तसे उगवेल ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल... ही म्हण शेजारी देश पाकिस्तानला तंतोतंत लागू पडतेय... कारण पाकिस्तानची राजधानी असलेलं इस्लामाबाद हे शहर सगळ्यात धोकादायक शहर असल्याचा रिपोर्ट खुद्द पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानचं दिलाय...
Feb 20, 2014, 12:56 PM ISTपंचायतीचं फर्मान; ३० जणांचा विधवेवर बलात्कार
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात भावाचं प्रेम चुकीचं ठरवतं त्याच्या या चुकीची शिक्षा त्याच्या विधवा बहिणीला दिली गेली... आणि ही शिक्षा होती, ३० जणांचा तिच्यावर सामूहिक बलात्कार...
Jan 31, 2014, 11:49 AM ISTजिलानी अमेरिकेत पाकिस्तानचे नवे राजदूत
अमेरिकेतील पाकिस्तानचे नवे राजदूत म्हणून जलील अब्बास जिलानी यांची नियुक्ती केली गेली आहे. जिलानी यांच्याकडे याआधी परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी होती.
Nov 9, 2013, 05:17 PM ISTत्याने गाडी थांबविली आणि धडाधड गोळ्या झाडल्या
पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीने अचानकपणे हवेत गोळीबार केल्यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद काही काळासाठी थांबली होती. पाकिस्तानच्या संसदेजवळ त्या व्यक्तीने आपली गाडी उभी केली आणि हवेत गोळीबार सुरू केला. पण काही वेळातच त्याला अटक करण्यात आले. हा प्रकार ६ तास सुरू होता.
Aug 16, 2013, 01:02 PM ISTपाकमधल्या ऐतिहासिक हिंदू मंदिरात तोडफोड
पाकिस्तानात पश्चिम भागातल्या पेशावरमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेल्या एका मंदिरात काही अज्ञात लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना घडलीय. पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल १६० वर्षांनी या मंदिराचे दरवाजे मागच्या वर्षी उघडण्यात आले होते.
May 21, 2012, 11:56 AM ISTपाकचे पंतप्रधान गिलानी दोषी
पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले. सर्वोच्च न्यायालयाने गिलानी यांना कलम ६३-जी अंतर्गत दोषी ठरविले आहे. आज गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, गिलानी यांना न्यायालयाने कोणतीही शिक्षा सुनाविलेली नाही.
Apr 26, 2012, 12:17 PM ISTसईदबाबत अमेरिकेकडे पुरावा नाही - पाक
अमेरिकेकडे लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि जमात-उल-दावाचा प्रमुख हफीज सईद याच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे.
Apr 5, 2012, 11:16 PM ISTपाकमध्ये बॉम्बहल्ल्यात सहा ठार
www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानात बॉम्बहल्ल्यात सहा जण ठार झाले तर अन्य नऊ जण जखमी झाले. या गाडीतून 15 जण खुराकाइहून जमरूड गावाकडे जातअसताना हा बॉम्ब हल्ला झाला.
Apr 4, 2012, 11:00 PM IST
9/11नंतर पाकमध्ये पाच ठिकाणी लादेनची वस्ती
९/११च्या हल्ल्यानंतर अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये पाच ठिकाणी राहत असल्याची माहिती त्याच्या लाडक्या ३० वर्षय बायकोने दिली आहे. पाकमध्ये पाच घरे असल्याचे तिने म्हटले आहे.
Mar 30, 2012, 12:47 PM ISTमुशर्रफना रेड कॉर्नर नोटीस?
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या अटकेसाठी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, यासाठी आवश्यक त्या प्रस्तावांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने संमती दिली असल्याची माहिती गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिली.
Mar 1, 2012, 01:55 PM ISTअफगाणला हवाय पाकचा पाठिंबा
अफगाणिस्तानमध्ये शांतता नादंण्यासाठी अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे पाठिंबाची मागणी केली आहे.
Feb 17, 2012, 10:58 PM ISTलादेनच्या घराजवळ रॉकेट हल्ला
पाकिस्तानातील अबोटाबाद येथील ओसामा-बिन-लादेनच्या निवासस्थानाजवळ असलेल्या मिलिटरी ऍकॅडमीवर अज्ञात हल्लेखोराने आज सकाळी रॉकेट हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
Jan 27, 2012, 12:21 PM IST