त्याने गाडी थांबविली आणि धडाधड गोळ्या झाडल्या

पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीने अचानकपणे हवेत गोळीबार केल्यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद काही काळासाठी थांबली होती. पाकिस्तानच्या संसदेजवळ त्या व्यक्तीने आपली गाडी उभी केली आणि हवेत गोळीबार सुरू केला. पण काही वेळातच त्याला अटक करण्यात आले. हा प्रकार ६ तास सुरू होता.

Updated: Aug 16, 2013, 01:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीने अचानकपणे हवेत गोळीबार केल्यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद काही काळासाठी थांबली होती. पाकिस्तानच्या संसदेजवळ त्या व्यक्तीने आपली गाडी उभी केली आणि हवेत गोळीबार सुरू केला. पण काही वेळातच त्याला अटक करण्यात आले. हा प्रकार ६ तास सुरू होता.
गुरूवारी सिकंदर ह्यात नावाचा व्यक्तीने आपली काळ्या रंगाची कार घेऊन आपल्या पत्नी आणि मुलांसह ‘व्यस्त जिन्ना एवेन्यू’ येथे पोहोचला. त्याने आपली गाडी तेथे उभी केली आणि हवेत गोळीवार करण्यास सुरूवात केली. त्याच्याकडे दोन हत्यारे होती. पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याने आपल्या मुलांना आणि पत्नीला पुढे करून स्वतःचा बचाव करत होता.
पाकिस्तानातील पीपल्स पार्टीचे जमरूद खान यांनी सहानुभूती दाखवत त्याच्याजवळ गेले. खान त्याच्याजवळ पोहोचतात पोलीस आधिकाऱ्यांनी त्याला पकडण्यास धाव घेतली पण तरीही पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकले नाही. त्यामुळे काही पोलिसांनी आधिकाऱ्यानी त्याच्या पायावर गोळी झाडली. त्याने आपले हत्यारवर केले पण तितक्यातच तो खाली पडला. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्या मुलांना, पत्नीला सुरक्षित गाडीतून बाहेर काढले.
सिकंदर ह्यात हा पाकिस्तानमधील हफीजाबाद येथे राहत असून त्याने मागणी केली होती की, अटक करण्याअगोदर पाकिस्तानात ‘शरियत कायदा’ चालू करा आणि सरकार काढून टाका. ह्यातला पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्याशी बोलायच होतं असं समजतयं.
त्या व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलांना काहीही इजा न होता ताब्यात घ्या, असं पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी पोलिसांनी सांगितले होते. पोलीस आधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या घटनेच्या आधी त्या व्यक्तीने संसदेच्या काही अंतरावर असणाऱ्या पोलीस आधिकाऱ्यासोबत वाद घातले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.