सांगा बाहेर पडायचं कसं?
राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. त्यातच चंद्रपूर शहराची तर देशातल्या सर्वात उष्ण शहराकडे वाटचाल होते आहे. आधीच पाणीटंचाई आणि त्यात वाढत्या तापमानाचा तडाखा यामुळे पुढचे दोन महिने कसा निभाव लागणार या काळजीनं नागरिक धास्तावले आहेत.
Apr 20, 2012, 02:29 PM ISTविदर्भात पाण्यासाठी वणवण
वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.
Apr 10, 2012, 01:11 PM ISTभाज्यांचे भाव कडाडले
उन्हाळ्याची चाहूल लागताच भाज्यांचे भाव कडाडलेत. गवार, काकडी तर तब्बल ८० रुपये किलो झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. ठोक बाजारात भाववाढ झाल्यानं किरकोळ बाजारात तर भाव गगनाला भिडले आहेत.
Mar 3, 2012, 06:20 PM IST