काळा पैसा

काळ्या पैशात वाटा कुणा-कुणाचा?

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारने परदेशी बँकांमधील ६२७ खातेधारकांची लिस्ट न्यायालयाला सोपवली आहे, ही यादी अजूनही बंद लिफाफ्यात आहे. मात्र परदेशी बँकांमध्ये ठेवलेला हा काळा पैसा धर्मनिरपेक्ष आहे. यात कोणत्याही धार्मिक आणि जातीय भिंती नाहीत, येथे कुणीही खालच्या किंवा वरच्या जातीचा म्हणून ओळखला जात नाही, इथे फक्त तो पैशांनी ओळखला जातो.

Oct 29, 2014, 03:54 PM IST

काळा पैसा : काय दडलंय त्या बंद पाकिटात?

परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवलेल्या ६२७ भारतीयांची यादी केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टाला सादर केली. तीन बंद लिफाफ्यांमध्ये ही यादी कोर्टाला देण्यात आलीय.

Oct 29, 2014, 03:21 PM IST

काळा पैसा : सरकारनं सादर केली ६२७ खातेधारकांच्या नावांची यादी!

काळ्या पैशांप्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला जोरदार दणका दिलाय. 

Oct 29, 2014, 09:56 AM IST

काळा पैसाप्रकरणी केजरीवालांनी जाहीर केली १५ जणांची यादी

काळा पैसा प्रकरणी कारवाई करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप करतानाच काळा पैसा दडवणाऱ्यांमध्ये अंबानी बंधू, नरेश गोयल, यशवर्धन बिर्ला यांचासह आणखी १५ मोठ्या उद्योजकांचा समावेश असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

Oct 27, 2014, 07:37 PM IST

काळ्या पैशांच्या यादीतील ३ नावं

काळ्या पैशांच्या मुद्यावर सरकारकडून आज स्पष्टीकरण देण्यात आलं आहे, सरकार १२ वाजता सुप्रीम कोर्टात प्रतिक्षापत्र सादर करणार आहे, टाइम्स नाऊ या इंग्रजी न्यूज चॅनेलने केलेल्या दाव्यानुसार,  प्रतिक्षापत्रात सरकार अशा ३ जणांचं नाव घेणार आहे, ज्यांची खाती स्विस बँकेत आहेत.

Oct 27, 2014, 12:00 PM IST

काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही - अरुण जेटली

काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून टीका झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. परदेशी बँकांमध्ये काळं धन ठेवणाऱ्या लोकांच्या नावाचा खुलासा होईल तेव्हा काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं अरुण जेटली यांनी म्हटलंय. 

Oct 21, 2014, 08:12 PM IST

काळ्या पैशाप्रकरणी मोदी सरकारचं घुमजाव

काळा पैसा परदेशी बँकांमध्ये लपवणा-या भारतीयांची नावं उघड करता येणार नाहीत, असं केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं. त्यामुळे मोदी सरकारचे हे घुमजाव असल्याचे बोलले जात आहे. भारताने अनेक देशांसोबत दुहेरी करप्रणालीसंदर्भात करार केले आहेत. त्या करारानुसार संबंधित देशांनी दिलेली काळ्या पैशांची माहिती उघड केल्यास, त्या करारांचा भंग होऊ शकतो. त्यामुळं ती माहिती उघड करता येणार नाही, असं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टापुढं सांगितलं.

Oct 17, 2014, 05:41 PM IST