नवी दिल्ली : परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवलेल्या ६२७ भारतीयांची यादी केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टाला सादर केली. तीन बंद लिफाफ्यांमध्ये ही यादी कोर्टाला देण्यात आलीय.
कोर्टानं हे लिफाफे उघडण्यास नकार दिला असून काळ्या पैशाबाबत नेमलेल्या ‘एसआयटी’कडे यादी सुपूर्द करण्यात आलीये. ‘एसआयटी’चे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनाच लिफाफे उघडण्याची परवानगी देण्यात आलीय. नोव्हेंबर अखेरीस ‘एसआयटी’नं स्थितिजन्य अहवाल द्यावा, असे आदेश कोर्टानं दिलेत. या यादीबाबत पुढे काय कारवाई करायची याचा निर्णयही ‘एसआयटी’नं घ्यावा, असं कोर्टानं म्हटलंय.
या यादीत स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि जर्मनीमधल्या बँकांमध्ये असलेल्या पैशांची माहिती देण्यात आलीय. सुप्रीम कोर्टानं काल केंद्र सरकारला फटकारलं होतं आणि यादी देण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुप्रीम कोर्टात सादर केली गेलेली काळ्या पैशांबाबतची यादी सार्वजनिक करावी अशी मागणी केली असून, सराकारने यादी सार्वजनिक न केल्यास लोकांनी एकत्र येत आंदोलन करावं अशी भूमिका मांडली
भारताचा काळा पैसा कुठे-कुठे आहे ते पाहूयात…
* स्वित्झर्लंडमध्ये ८३८ अब्ज डॉलर काळे धन
* स्वित्झर्लंडची अर्थव्यवस्था २२.५ अब्ज डॉलर
* मॉरिशसमध्ये १४.५ अब्ज डॉलर काळे धन
* मॉरिशसची संपूर्ण अर्थव्यवस्था ९.४ अब्ज डॉलर
* बहमासमध्ये ३४८ अब्ज डॉलर काळे धन जमा आहे
* बहमासची अर्थव्यवस्था केवळ ७.५ अब्ज डॉलर
* सिंगापूरमध्ये ४४५ अब्ज डॉलर काळापैसा जमा आहे
* सिंगापूरची अर्थव्यवस्था २१७ अब्ज डॉलर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.