घुसखोरीचा प्रयत्न

जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, एक दहशतवादी ठार

जम्मू-कश्मीरमधील नौगाम सेक्टरमधून आताची मोठी बातमी समोर आली आहे की, पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून भारतीय सीमेतून घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातलं असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Oct 6, 2016, 03:25 PM IST

१०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान काही शांत बसतांना दिसत नाही आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानी सेना १०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे. एलओसीमध्ये लॉंचिंग पॅड्सवर पुन्हा एकदा अनेक दहशतवादी एकत्र आल्याची माहिती बीएसएफकडून मिळत आहे. पाकिस्तानी सेना सीमेवर गोळीबार करुन जवानांचं लक्ष विचलित करुन दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करत आहे.

Oct 5, 2016, 09:26 AM IST

भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी बोट

एलओसीमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानी सीमेलगत सर्व राज्यांना हायअलर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातच मल्टी एजेंसी सेंटर (MAC) ने गुजरात आणि इतर राज्यांना सूचना दिली आहे की, पाकिस्तानातील कराची येथून निघालेली दोन संशयित बोट ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या दिशेने निघाली आहे.

Oct 3, 2016, 11:42 AM IST