जितेंद्र आव्हाड

ठाण्यात आघाडीत शेवटपर्यंत रस्सीखेच

ठाणे महापालिका निवडणुकीत झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी केवळ दोन तीन जागांचा तिढा न सुटु शकल्याने तुटणार का ? हा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या दोन वाजता चर्चा होणार असल्याचं समजतं.

Jan 31, 2012, 03:45 PM IST

अबू आझमींचं टीकास्त्र

वरिष्ठ नेत्यांसमोर आपली पत वाढवण्यासाठी जितेंद्र आव्हाड पैशाच्या जोरावर नगरसेवक फोडत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा इथल्या सपाच्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Jan 16, 2012, 08:20 AM IST

आव्हाडांना कंटाळले, शिवसेनेला मिळाले

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मुंब्र्याचे नगरसेवक सुधीर भगत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. सुधीर भगत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Jan 11, 2012, 01:03 PM IST

ठाण्यात राष्ट्रवादीत गटबाजी?

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत ठाण्याचे शहराध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार संजीव नाईक यांना निमंत्रणच नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं डावखरे आणि आव्हाड यांच्यात गटातटाचं राजकारण रंगलय.

Jan 9, 2012, 05:21 PM IST

ठाणे एथेलेटिक निवडणूक, आव्हाड चीत

ठाणे जिल्हा एथेलेटिक असोसिएशनची निवडणूकीत एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पराभव केला. १६५ मतांपैकी शिंदे यांना १०६ तर जितेंद्र आव्हाड यांना ५९ मते मिळाली. राजकीय नेत्यांनी या निवडणूकीत सहभाग घेतल्यानं रंगत आली.

Nov 14, 2011, 10:57 AM IST