जिया खान

जिया खानची आत्महत्या नाही तर तिचा खून!

जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाबाबत नवीन माहिती पुढे आली आहे. तिने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून झाला असावा, असे सांगितले जात आहे. तसा नवीन फॉरेंसिक रिपोर्ट आला आहे. त्यात म्हटले आहे की जियाने आत्महत्या केलेली नाही. तिला कोणीतरी लटकविले असेल.

Nov 9, 2013, 05:47 PM IST

जियाची आत्महत्या नाही तर हत्या; आईचा दावा

अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा आरोप जियाची आई राबिया खान यांनी केलाय. त्यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून सीबीआय तपासाची मागणी केलीय.

Oct 4, 2013, 06:40 PM IST

आत्महत्येपूर्वी जिया दारूच्या नशेत

‘नि:शब्द’ची अभिनेत्री जिया खानने आत्महत्या करण्यापूर्वी दारू प्यायली होती, हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे या प्रकणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरज याच्याशी तिचे प्रेम संबंध आणि लिव्ह इन संबंध होते.

Jul 9, 2013, 10:54 AM IST

जिया खान आत्महत्या : सुरजला जामीन मंजूर!

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुरज पांचोली याला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय.

Jul 1, 2013, 02:13 PM IST

सुरज पांचोलीची ‘एक्स-गर्लफ्रेंड’ मीडियासमोर...

जिया खान आत्महत्या प्रकरणात सुरज पांचोलीची एकेवेळची गर्लफ्रेंड असलेली जान्हवी तुराखिया ही अखेर समोर आलीय.

Jun 25, 2013, 11:54 AM IST

जिया खानची `सुसाइड नोट` नकली?

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवं वळण लागण्याची शक्यता आहे. जिया खानच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या जिया खानच्या ६ पानी सुसाइड नोटमधील अक्षर तिचं नसल्याचा संशय पोलिसांना आला आहे.

Jun 18, 2013, 04:51 PM IST

जिया-सुरजच्या नात्याबद्दल माहितीच नव्हती तर...

‘जिया खान आणि सूरज पांचोली यांच्या प्रेमसंबंधांबद्दल मला माहितीच नव्हती, माझं नाव उगाचच या प्रकरणात गोवण्यात येतंय’ अशी भूमिका अभिनेता सलमान खान यानं घेतलीय.

Jun 18, 2013, 12:24 PM IST

होय... जियाचा गर्भपात झाला होता!

जिया खान हिच्या पत्रात उल्लेख असल्याप्रमाणे तिचा गर्भपात झाला होता, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. या वर्षांच्या सुरुवातीला तीचं अबॉर्शन झालं होतं, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. ३ जून रोजी तिनं जुहूस्थित राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

Jun 13, 2013, 02:13 PM IST

सूरजची कबुली, जियासोबत लिव्ह इन संबंध

अभिनेत्री जिया खान आणि सूरज पांचोली यांचे प्रेमसंबंध होते. हे आता अधिकृत स्पष्ट झालेय. सूरजने आपले जियासोबत लिव्ह इन संबंध असल्याचे स्पष्ट कबुली दिलेय.

Jun 13, 2013, 12:04 PM IST

जिया-सूरजचे ‘लिव्ह इन संबंध’!

अभिनेत्री जिया खान आणि सूरज पांचोली यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे गेल्या वर्षभरापासून ‘लिव्ह इन संबंध’ ठेवून होते, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली.

Jun 12, 2013, 11:07 AM IST

जियाच्या आईचा सूरजच्या आईला भेटण्यास नकार

जिया खान आणि सूरज पांचोली हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत असल्याचं जिया खान हिच्या आईनं – राबिया खान - यांनी पोलिसांना सांगितलंय.

Jun 12, 2013, 10:45 AM IST

अखेरचे शब्द!

का घेतला तिने टोकाचा निर्णय?
कुणी केला तिचा विश्वासघात?
काय लिहिलं तिने शेवटच्या पत्रात?

Jun 11, 2013, 11:43 PM IST

जिया आत्महत्या प्रकरणात सलमानचंही नाव

जिया खान आत्महत्या प्रकरणातील एक एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता याच प्रकणात अभिनेता सलमान खान याचंही नाव पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, जियाची आई राबिया खान यांनी या प्रकरणात सलमानचंही नाव घेतलंय.

Jun 11, 2013, 03:25 PM IST

जिया खान आत्महत्या प्रकरण : सुरज पांचोलीला अटक

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलिसांनी जिया खानचा बॉयफ्रेंड सुरज पांचोली याला अटक केली आहे. जिया खानच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सहा पानी पत्रामध्ये जिया खान आणि सुरज पांचोलीच्या नात्यामधील काही रहस्यमय गोष्टी उघडकीस आल्या.

Jun 10, 2013, 07:03 PM IST

जियाच्या पत्रात, बाळाला या जगात येऊ दिले नाही?

अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने धाडसी पाऊल उचलत जियाचे सहा पानी पत्र जगजाहीर केलेय. या पत्राद्वारे जियाच्या मृत्यूला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. जियाने आपल्या प्रेमाचे प्रतिक असणारे बाळ या जगात येऊ दिले नसल्याचे म्हटलेय.

Jun 10, 2013, 12:33 PM IST