जेडीयू

पुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव

जेडीयूचे खासदार के.सी.त्यागी यांनी बाबा रामदेव यांच्या पूत्र जन्मासाठीच्या औषधाचा मुद्दा आज संसदेत उपस्थीत केला. के.सी.त्यागी यांनी त्या औषधाची पाकीटं देखील संसदेत दाखवली. औषधांची पाकीटं त्यांनी स्वत: विकत आणली होती. आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Apr 30, 2015, 02:12 PM IST

'पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी'

"पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी"  असं आक्रमक वक्तव्य संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. 'पद्म पुरस्कार केवळ अप्रामाणिक आणि समाजातील उच्च वर्गातील लोकांनाच दिले जातात. अशा पुरस्कारांवर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी लाथच मारली पाहिजे', असं यादव यांनी म्हटलंय, यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण केला. 

Apr 12, 2015, 10:16 AM IST

बिहारचे मुख्यमंत्री मांझींची पक्षातून हकालपट्टी

 बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जेडीयू हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा पक्षादेश न पाळल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Feb 9, 2015, 05:26 PM IST

असीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू

असीमानंद यांच्या आरोपानंतर काँग्रेस, बसपा आणि जेडीयू या तीन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.

Feb 6, 2014, 06:23 PM IST

`जेडीयू`ची `आप`ला समर्थनाची तयारी, केजरीवाल मुख्यमंत्री बनणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा पेच वाढत चाललाय. याच दरम्यान नीतीशकुमार यांच्या पक्षानं म्हणजेच जेडीयूनं ‘आम आदमी पार्टी’ला समर्थन देण्याची तयारी दाखवलीय.

Dec 9, 2013, 04:19 PM IST

बिहारमध्ये नितीशकुमारांना काँग्रेसने तारले

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Jun 19, 2013, 10:00 PM IST

संगमांचं जेडीयू-सेनेला पाठिंब्यासाठी आवाहन...

आज दुपारी भाजपनं पी. संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपनं जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे पी. संगमा यांचा आत्मविश्वासही दुणावलाय. भाजपनंतर आता जेडीयू आणि शिवसेनेलाही समर्थनासाठी गळ घातलीय.

Jun 21, 2012, 07:03 PM IST