टोलनाका

राजच्या इशाऱ्यानंतर सरकारची चर्चेसाठी धावाधाव

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल नाक्यांच्या संदर्भात चर्चेची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरे यांनी पुकारलेल्या उद्याच्या टोल आंदोलनापासून सुटका मिळवण्यासाठी सरकारची धावाधाव सुरू झाली आहे.

Feb 11, 2014, 02:36 PM IST

कोल्हापुरातील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे राजीनामे

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापुरातील टोल नाक्यावर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीचे राजीनामे दिले आहेत. यामुळे टोलवसुली विरोधातील आंदोलनाला कोल्हापुरात बळ मिळालं आहे.

राजीनामे देऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. कोल्हापुरात सर्वात आधी टोलला विरोध झाला आहे.

आयआरबी कंपनीने केलेल्या खर्चाचे पुर्नमूल्यांकन करण्याचे आदेशही सरकार देणार असल्याचं यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. कोल्हापुरातील जनतेने सर्वात जास्त कडाडून टोल वसुलीला विरोध केला आहे.

Feb 10, 2014, 01:31 PM IST

राज ठाकरेंनी सांगितलेलं `येणेगूर टोलनाक्याचं गौडबंगाल`

राज ठाकरे यांनी पुण्याच्या भाषणात येणेगूर टोलनाक्याचा उच्चार केला होता. हा टोल नाका कशासाठी आहे, हेच माहित नाही आणि ३ कोटी वसुली २ महिन्यात होते, तरीही वर्षभरापासून येथे वसुली सुरूच आहे.

Feb 10, 2014, 11:41 AM IST

राज्यभर मनसे कार्यकर्त्यांची लवकरच धरपकड?

येत्या १२ तारखेला मनसेचं टोलविरोधात रास्तारोको आंदोलन आहे. या आंदोलनात टोल नाक्याचे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे १२ वाजू नयेत, म्हणून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड होण्याची दाट शक्यता आहे.

Feb 10, 2014, 10:24 AM IST

टोल`फोड`च्या बोलावर राज ठाकरेंवर तिसरा गुन्हा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केल्य़ाचा आरोप ठेवण्यात आलाय.

Jan 30, 2014, 10:02 PM IST

तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई -अजित पवार

मनसेनं सुरू केलेल्या टोल विरोधातल्या आंदोलनावर आता सरकारनं कारवाईचे संकेत दिले आहेत. टोलची तोडफोड करून कायदा हातात घेणा-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

Jan 27, 2014, 07:11 PM IST

आधी टोलवसुली, आता विरोध - भुजबळ

शिवनसेनेत असताना ज्यांनी टोलवसुलीला सुरूवात केली तेच आता टोलला विरोध करत आहेत, असा टोला आज राज ठाकरे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. टोल बंद झाले तर सरकारकडे निधी आल्यावरच रस्त्याची कामं करावी लागतील, असंही भुजबळ यांनी म्हटलंय.

Jan 27, 2014, 02:44 PM IST

`राज` आदेशानंतर राज्यभरात `टोल`फोड!

राज्यात पुन्हा एकदा टोलवरुन वातावरण तापलंय. टोल भरु नका असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते टोलविरोधात रस्त्यावर उतरलेत... राज्यात विविध ठिकाणी टोलनाक्यांवर तोडफोड झालीय...

Jan 27, 2014, 08:35 AM IST

कोल्हापूर मनपाच्या महासभेत आयआरबी विरोधात ठराव

कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत आज आयआरबी विरोधात ठराव मंजूर करण्यात आला. कोल्हापुरात टोल वसुली बंद करा, असा ठराव महापालिकेच्या महासभेत आज मंजूर करण्यात आला

Jan 16, 2014, 03:44 PM IST

मोदी तोंडावर; गुजरातपेक्षा महाराष्ट्राच्या टोलची कमाई जास्त!

‘बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स’मध्ये नुकतंच मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारवर टीका करत जोरदार टाळ्या मिळवल्या. पण, या सभेसाठी मोदी मात्र तयारीविनाच आल्याचं किंवा त्यांनी तयारी केलीही असेल तरी ती चुकीच्या पद्धतीनं केल्याचं आता उघड झालंय.

Dec 25, 2013, 04:47 PM IST

`राणे` समर्थक गुंडांनी मुंबईत केली गाड्यांची तोडफोड?

मुंबईत मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी धु़डगूस घातला. मुंबईहून गोवा आणि पुण्याकडे जाणाऱ्या बसेस या व्यक्तींनी टार्गेट करत तोडफोड केली. ही तोडफोड ‘राणे’ समर्थक गुंडांनी केली असल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

Dec 4, 2013, 11:01 AM IST

‘राणेपुत्रा’ची रातोरात जामिनावर सुटका

उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची जामिनावर सुटका झालीय. दहा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलीय. त्यांच्यासह इतर चौघांचीही जामिनावर सुटका झालीय.

Dec 4, 2013, 07:56 AM IST

राणे पुत्राची गुंडगिरी, नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना गोव्यात अटक

उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Dec 3, 2013, 08:09 PM IST

कोल्हापुरात आजपासून टोल वसुली, आंदोलकांचा ठिय्या!

कोल्हापुरात आजपासून टोल वसुली सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. परिसरात कलम १४४लागू करण्यात आलाय.

Oct 17, 2013, 11:03 AM IST

अज्ञात व्यक्तींकडून टोल कर्मचाऱ्यावर गोळीबार

अज्ञात व्यक्तींनी टोल कर्मचा-यावर गोळीबार केल्याची घटना खेड-शिवापूर टोल नाक्यावर घडली आहे. मंगळवारी रात्री घटना घडली.

Oct 16, 2013, 11:07 AM IST