ठाणे

होळीत गच्चीवरून पाण्याचे फुगे , पिशव्या मारल्या तर गुन्हा पदाधिकाऱ्यांवर

 यंदा होळीत ठाण्यामध्ये इमारतीच्या गच्चीवरून पाण्याचे फुगे आणि पिशव्या मारल्या गेल्या, तर ते सोसायटीच्या पदाधिका-यांना भारी पडू शकतं. तशी तक्रार आल्यास पदाधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.

Mar 4, 2015, 05:51 PM IST

ठाण्यात मुलींना धावत्या रिक्षातून उडी मारावी लागली

ठाण्यात काही रिक्षावाल्यांकडून अजूनही महिला सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण दोन मुलींनी स्व:तला वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली आहे. या प्रकरणात या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

Mar 2, 2015, 09:22 AM IST

पुन्हा अवकाळी पाऊस; स्वाईन फ्लू फैलावण्याची भीती

मार्च महिन्याला सुरुवात होतेय. त्यामुळे आता खरं तर उकाड्याचं वातावरण असायला हवं. मात्र, आज दुपारपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसानं हजेरीही लावली. यामुळे पिकांचं तर नुकसान होईलच शिवाय स्वाईन फ्लूही फैलावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Feb 28, 2015, 07:39 PM IST

रेल्वे अर्थसंकल्प : मुंबईकरांसाठी काय मिळणार, याची उत्सुकता?

रेल्वेचा अर्थसंकल्प उद्या २६ फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये सादर होणार आहे. रेल्वे बजेटकडे तमाम मुंबईकरांचे डोळे लागले आहेत. मुंबईसाठी या बजेटमध्ये काय असणार याची अनेकांना उत्सुकता आहे. याच निम्मितानं पश्चिम रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत आणि सध्या त्यांना रेल्वेच्या कुठल्या समस्या भेडसावत आहेत, याचा आम्ही आढावा घेतला आहे. त्यावरचा एक रिपोर्ट.

Feb 25, 2015, 10:44 AM IST

व्हॅलेंटाईन डेला विरोध करत विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांचा धिंगाणा

व्हॅलेंटाईन डेला विरोध करत ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. व्हॅलेंटाईन डेच्या वस्तू दुकानातून काढून रस्त्यावर जाळल्या. विश्व हिंदू परिषदेच्या १५ कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. नौपाडा परिसरात हा प्रकार घडला.

Feb 14, 2015, 11:11 PM IST