दहीहंडी

'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

Aug 27, 2016, 06:23 PM IST

राज ठाकरे घेणार गुन्हा दाखल झालेल्या गोविंदा मंडळांची भेट

दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती.

Aug 27, 2016, 05:37 PM IST

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी

शहरातील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 34 गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे.

Aug 25, 2016, 11:57 PM IST

रत्नागिरीत नदीत दहीहंडी

जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गिम्हवी गावात दरवर्षी आगळीवेगळ्या पद्धतीनं दहीहंडी उत्सव साजरा होतो. नदीत दहीहंडी बांधली जाते आणि गावातले गोविंदा ही हंडी फोडण्यासाठी येतात.

Aug 25, 2016, 11:36 PM IST

दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी वाटली मिठाई

दहीहंडी म्हटले की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतूककोंडी हे ओघाने आले. ज्या परिसरात ही दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो. मात्र, दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Aug 25, 2016, 07:58 PM IST

ठाण्यात मनसे आयोजक, जय जवान पथकावर गुन्हा दाखल

जय जवान पथक आणि अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली.

Aug 25, 2016, 04:54 PM IST

मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन

 मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन झालं. जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली. तर आम्ही कोपरीकर या मंडळाने आठ थर लावले. यामध्ये सर्वात शेवटच्या थराला बालगोविंदाचा समावेश होता.

Aug 25, 2016, 03:48 PM IST

दहीहंडीबाबत निर्णयाचा मुंबईत अनेक ठिकाणी निषेध

दादारमध्ये अनोख्या पद्धतीनं दहीहंडीचे थर लावण्यात आले. गोविंदा मंडळांनी कोर्टाच्या आदेशांचं पालन करत उंचावर थर न लावता चक्क झोपून थर लावले. 

Aug 25, 2016, 12:39 PM IST

राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत. दहीहंडीसारखी प्रकरणं कोर्टात जातातच कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. तसंच उत्सवातील धांगडधिंगा बंद होऊन सण सणासारखाच साजरा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. 

Aug 24, 2016, 11:32 PM IST