दिल्ली

अण्णांनी ठोकला शड्डू, मोदींना दिला इशारा; म्हणाले ...तर उपोषण करेन!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याच्या विचारात आहेत. अण्णांनी पत्र लिहून मोदी सरकारला तसा इशारा दिला आहे. पत्रातील मागण्यांची अंमलबजावणी व्हावी अन्यथा आपण उपोषणाला बसू असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.

Aug 30, 2017, 06:56 PM IST

सिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या

वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या. 

Aug 28, 2017, 04:00 PM IST

दिल्लीत पुन्हा 'आप'चा विजय, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

 बवाना पोटनिवडणुकीत चुरस पाहायला मिळाली.  ११ व्या फेरीत आप उमेदवाराने आघाडी घेत  भाजप आणि काँग्रसेला दे धक्का देत विजय मिळवला.

Aug 28, 2017, 01:52 PM IST

भाजप खासदार मनोज तिवारींवर दगडफेकीचा प्रयत्न

दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीमध्ये एका बैठकीदरम्यान हा प्रकार घडला आहे. 

Aug 20, 2017, 05:36 PM IST

दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.

Aug 18, 2017, 01:19 PM IST

येथे मिळतात ७५० रूपयात फक्त ४ पाणीपुरी !

 भारताची खाद्यसंस्कृती फारच संपन्न आहे.

Aug 17, 2017, 03:26 PM IST

मोदींच्या नावे देणगी मागणाऱ्याचे पितळ उघड

भ्रष्टाचारमुक्त भारत, काळा पैसा भारतात आणणार अशा अनेक आश्वसनांवर मोदी सरकार सत्तेत आले.   कामात पारदर्शकता आणण्याचा  सरकारचा प्रयत्न सुरु आहे. पण मोदींच्या नावे भ्रष्टाचार करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे.  नवी दिल्लीतील फरीदाबाद येथे हा प्रकार समोर आला आहे. 

Aug 13, 2017, 03:33 PM IST

विवाहीत महिला फायटर पायलट, मग आर्मीत JAG का नाही बनू शकत - हायकोर्ट

भारतीय सेनेच्या जज अॅडवोकेट जनरल (जेएजी) मध्ये विवाहित महिलांना नियुक्तीपासून वंचित ठेवणं १०० टक्के भेदभाव असल्याचं मत, दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय. 

Aug 10, 2017, 10:27 PM IST

वेणी कापणाऱ्या गँगमुळे चार राज्यांमध्ये दहशत

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुलींची वेणी कापणाऱ्या गँगच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली आहे.

Aug 3, 2017, 04:28 PM IST

देशातील २९ शहरांना भूकंपाचा सर्वाधिक धोका

राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्वाची शहरं तीव्र आणि अतितीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात.. राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेनं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.  यापैकी बहुतांश शहरं हिमालयाच्या पायथ्याशी असणारी आहेत. 

Jul 31, 2017, 08:34 AM IST