निलंबन

निलंबन कारवाई : काँग्रेसला मुलायम, मायावतींची साथ

गेल्या काही दिवसांपासून एकट्या पडत चाललेल्या काँग्रेसला आज मात्र 9 पक्षांची साथ मिळालीय. काँग्रेसच्या खासादारांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलानात मुलायम मायावतीही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत निदर्शनं केली. 

Aug 4, 2015, 05:40 PM IST

काँग्रेसच्या २५ खासदारांचे लोकसभेतून निलंबन

लोकसभा सभापतींनी काँग्रेसच्या २५ खासदारांना ५ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. संसदेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अडथळा आणल्याने ही निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 3, 2015, 05:36 PM IST

आता, 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांना निलंबनाची धमकी

'एफटीआयआय'मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी थांबवावं, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात येईल, अशा इशारा संस्थेच्या संचालकांनी दिलाय. तशा आशयाच्या कारवाईच्या नोटिसा विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्यात.

Jul 16, 2015, 01:33 PM IST

महाराष्ट्र सदन घोटाळा भोवला, दीपक देशपांडेंना घरचा रस्ता

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बांधकाम खात्यातील घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे यांना औरंगाबादच्या माहिती आयुक्तपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. 

Jun 21, 2015, 10:28 AM IST

विषारी दारूकांडाच्या बळींची संख्या ५३ वर; ८ पोलीस निलंबित

 मालाड विषारी दारू दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ५३ वर पोहचलीय. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४० जणांपैकी ११ जणांची स्थिती अजूनही गंभीर आहे.

Jun 19, 2015, 06:42 PM IST

राज्य सरकारला 'मॅट'चा दणका, 'त्या'सात तहसीलदारांच्या निलंबनाला स्थगिती

नाशिकमधील धान्य घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 7 तहसीलदारांना मॅटनं मोठा दिलासा दिलाय. या 7 तहसीलदारांच्या निलंबन आदेशाला मॅटनं स्थगिती दिलीय. 

Jun 16, 2015, 05:42 PM IST

मनसेचा कळवा हॉस्पिटलला दणका, हाऊस ऑफिसर निलंबित

कळवा हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेला उपचार न मिळाल्यानं मनसेनं रुग्णालयात आज हंगामा केला. दरम्यान, या मुजोरी प्रकरणी हाऊस ऑफिसर सविता उप्पड यांचं निलंबन करण्यात आलंय. 

Mar 13, 2015, 10:43 PM IST

काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे

काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय.

Dec 23, 2014, 07:36 PM IST

कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी चार अधिकाऱ्यांचं निलंबन

राज्यातल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी युती सरकारनं कारवाईचा धडाका सुरू केल्याचं चित्र दिसतंय. याची सुरूवात कोंढाणे धरण घोटाळ्यापासून सुरू करण्यात आलीय. कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी सिंचन खात्याच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात ही घोषणा केली.

Dec 17, 2014, 09:18 PM IST