पाऊस

कोकणात मान्सून रेंगाळला

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून सध्या तिथंच रेंगाळलाय. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाला. दरम्यान, गोव्यात मान्सून सक्रिय झालाय.

Jun 12, 2015, 09:59 AM IST

गोव्यात मान्सून सक्रीय, रिमझिम सुरुच

गोव्यात  मान्सून सक्रीय झाल्यापासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत पावसान गोव्यातल्या सर्व भागांत मुसळदार हजेरी लावलीय. 

Jun 12, 2015, 09:56 AM IST

राज्यात वीज पडून सहा शेतमजुरांचा मृत्यू

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सहा जणांसाठी काळ ठरला. गुरुवारी दुपारी जिल्ह्यातल्या कोरपना, जिवती, गडचांदूर भागात विजांसह मुसळधार पाऊस झाला. यावेळी एका झोपडीवर वीज पडून सहा शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. 

Jun 12, 2015, 09:47 AM IST

मुंबई-उपनगरात दमदार पाऊस

मुंबईकरांची सकाळ आज मान्सून पावसानं उगवली. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रिमझिम पाऊस सुरु आहे.

Jun 12, 2015, 09:37 AM IST

लातूरमध्ये पासचाची दमदार हजेरी

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांत काल पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात लातूरमध्ये पाऊस पडला.

Jun 11, 2015, 11:24 AM IST

राज्यात पावसाचं आगमन, मुंबई-पुण्यात बरसल्या जलधारा

पुणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Jun 7, 2015, 02:49 PM IST

केरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे. 

Jun 5, 2015, 03:06 PM IST

कोकणात पहाटे पाऊस, मुंबईत पावसाचा शिडकावा

बातमी पावसाच्या आगमनाची. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रीय झालाय. दरम्यान, कोकणात रत्नागिरी, संगमेश्वर, खेड येथे पहाटे चांगलाच पाऊस झाला. तर मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण होते. यावेळी पावसाचा शिडकावा झाला.

Jun 5, 2015, 10:29 AM IST