कोकणात पहाटे पाऊस, मुंबईत पावसाचा शिडकावा

बातमी पावसाच्या आगमनाची. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रीय झालाय. दरम्यान, कोकणात रत्नागिरी, संगमेश्वर, खेड येथे पहाटे चांगलाच पाऊस झाला. तर मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण होते. यावेळी पावसाचा शिडकावा झाला.

Updated: Jun 5, 2015, 12:37 PM IST
कोकणात पहाटे पाऊस, मुंबईत पावसाचा शिडकावा title=

मुंबई : बातमी पावसाच्या आगमनाची. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रीय झालाय. दरम्यान, कोकणात रत्नागिरी, संगमेश्वर, खेड येथे पहाटे चांगलाच पाऊस झाला. तर मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण होते. यावेळी पावसाचा शिडकावा झाला.

येत्या २४ ते ४८ तासात मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. खरं तर यंदा ४ दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला होता. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला. त्यावेळची परिस्थिती मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल नव्हती. मात्र आता परिस्थिती बदलली असून, दोन दिवसात मान्सून केरळात दाखल होऊ शकतो.

बदललेल्या वातावरणानं मुंबईत आजची सकाळ उगवली. सकाळच्या सुमारास मुंबईच्या काही उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.. दादर, माटुंगा, माहीम या भागात सकाळी बरसलेल्या पावसाच्या सरींमुळं वातावरण आल्हाददायक झाल्याचं पाहायला मिळालं.. गेल्या अनेक दिवसांपासून घामाच्या धारांनी हैराण असलेल्या मुंबईकरांना या सरींमुळं काही अंशी दिलासा मिळालाय.. तसंच राज्याच्या विविध भागातही पावसानं हजेरी लावली... तर अनेक ठिकाणी काळे ढग दाटून आलेत.. त्यामुळं लांबलेल्या मान्सूननं दणक्यात एंट्री मारावी अशी प्रतीक्षा सा-यांना लागलीय.. 

रायगड जिल्ह्यात अलिबाग, पनवेल तसेच अहमदनगर जिल्ह्यात पहाटे चांगला पाऊस झाला. तर धुळ्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने झोडपले. अनेक गावांमध्ये जोरदार गारपीटही झाली. पन्नासहून अधिक झाडे उन्मळल्याने घरांचेही नुकसान झाले. कांद्याच्या चाळीही जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यातच कपाशीचे रोप ठिंबक सिंचनाच्या नळ्यांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झालेय. न्याहळोद आणि कौठळ परिसराला गुरुवारी पहाटे पावसाने झोडपले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.