पाऊस

अखेर पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णित

तिरंगी मालिकेतील आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेर पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. सामना सुरू होण्यास उशीर झाला कारण आधीच पावसाची रिपरिप सुरू होती, यानंतरही मध्ये पावसाचा व्यत्य आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

Jan 26, 2015, 03:54 PM IST

राज्यात अवकाळी तडाखा, विदर्भ-कोकणात पाऊस

नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने आज हजेरी लावली. नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, नागपूर, आणि कोकणातही पाऊस पडला.

Jan 1, 2015, 02:11 PM IST

कमी दाबाचा पट्टा, पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्र आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत पुण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. 

Jan 1, 2015, 11:34 AM IST

सावधान : राज्यात अवकाळी पाऊस; रोगांसाठी पोषक वातावरण

गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. लक्षद्वीप बेटापासून दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन-ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय. 

Nov 15, 2014, 10:35 AM IST