कमी दाबाचा पट्टा, पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्र आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत पुण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. 

Updated: Jan 1, 2015, 11:38 AM IST
कमी दाबाचा पट्टा, पावसाची शक्यता title=

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात दक्षिण आंध्र आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत पुण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला.

शिवाय राज्यातील हवेचा दाब कमी झाल्यानं गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आलीये. सध्या हा दाब एक हजार दहा हेप्टापास्कल इतका झाला आहे. अशात बंगालच्या उपसागराकडून येणारे ढग आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यात एकत्र आल्यास विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट होऊ शकते.

दरम्यान, महाराष्ट्रात नाशिक, नागपूर आणि कोकणात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.