जयपूर जलमय... चार जणांचा मृत्यू
गुलाबी नगरी म्हणून ओळखली जाणारी राजस्थान राजधानी जयपूर सध्या पाण्यात बुडालीय. जयपूरमध्ये पावसानं एकच हाहाकार उडवून दिलाय. यामध्ये चार लोकांचा मृत्यू झालाय.
Aug 22, 2012, 12:14 PM ISTपावसाचं जोरदार कमबॅक; ठिकठिकाणी साचलं पाणी
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या वरुणराजानं मुंबईत दमदार कमबॅक केलंय. रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे.
Aug 19, 2012, 09:30 AM ISTधान्य महागलं... तोंडात काय बोटं घालणार?
अन्नधान्यांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालीय. साखर, ज्वारी, बाजरीचे दर चांगलेच वाढलेत. २५ टक्क्यांनी धान्य महाग झालेत. अजूनही पाऊस झाला नाही तर आणखी भाव वाढण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Aug 9, 2012, 01:28 PM ISTकडू कांदा; शेतकऱ्यांचा वांदा!
वरूणराजाचं आगमन लांबल्यानं नाशिकचा कांदा महागण्याची शक्यता आहे. पेरण्या लांबल्याने पोळ कांद्याचं पीक सप्टेंबरपर्यंत येणार आहे. त्यामुळे सध्या शेतात साठवलेला कांदा बाजारात कमी पडणार आहे.
Aug 8, 2012, 07:58 AM ISTआवक घटली, भाज्या कडाडल्या...
पावसानं ओढ दिल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसांपासनं भाज्यांची आवक कमी झालेली दिसून येत आहे. भाज्यांचे भाव १० ते १५ टक्क्यांनी वाढलेले दिसतात.
Jul 14, 2012, 12:20 PM ISTपावसासाठी... बेडकाचं अन् गाढवाचं लग्न
राज्यात मान्सून बरसला असला तरी काही भाग मात्र अजूनही कोरडाच आहे. सोलापूरमध्येही पावसाची वाट पाहतोय. पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयत्नही सुरू आहेत. यातलाच एक प्रयत्न म्हणजे बेडकाचं लग्न... अगदी साग्रसंगीत पद्धतीनं तब्बल तीन दिवस हा सोहळा पार पडला.
Jul 13, 2012, 04:21 PM ISTशरद पवारांनी व्यक्त केली चिंता
काही दिवसांपूर्वी पावसाची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगून दिलासा देणा-या कृषी मंत्री शरद पवारांनी आता मात्र महाराष्ट्र, कर्नाटकातील कमी पाऊस ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलंय.
Jul 11, 2012, 10:35 PM ISTपावसाची महाराष्ट्रभर जोरदार हजेरी
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल हवामानामुळे पश्चिम किनारपट्टीवर वरुणराजा चांगलाच प्रसन्न झालेला दिसतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलीय. आज दिवसभर कोकणात काय दैना उडवलीय पावसानं... टाकूयात एक नजर...
Jul 3, 2012, 07:04 PM ISTमहापौर म्हणतात, मुंबईत पाणी भरलं कुठे?
मुंबईत बुधवारी रात्रभर पडणाऱ्या पावसानं मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरवले. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं ऑफिसला जाणा-यांचे हाल झाले.
Jun 29, 2012, 09:35 PM ISTपावसाने मुंबई-गोवा हायवेवर कोंडी
पावसामुळं मुंबई गोवा हायवेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. वडखळ नाका-नागोठणे दरम्यान वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
Jun 10, 2012, 11:02 PM ISTअवकाळी पावसाने द्राक्ष, कांदे उध्वस्त
नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आला आणि शेतीचं पुरतं नुकसान करुन गेला. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस झाल्यानं शेतकरी पुरता धास्तावलाय. वादळी पाऊस आणि गारपिटीनं द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत आणि कांदेही सडून गेलेत.
May 11, 2012, 09:14 PM ISTसिंधूदुर्ग किनारपट्टीला वादळाचा इशारा
सिंधूदुर्गात किनारपट्टीत वादळाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 28, 2011, 01:23 PM IST