पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये भीषण आग, १९१ जणांचा मृत्यू

पाकिस्‍तानात दोन कारखान्‍यांना लागलेल्‍या आगीमध्‍ये सुमारे १९१ जणांचा मृत्‍यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Sep 12, 2012, 04:45 PM IST

पाकिस्तानला महाराष्ट्रात खेळू देणार नाही- राज

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच महाराष्ट्रात खेळू देणार नसल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानची क्रिकेट टीम भारताच्या दौ-यावर येणाराय.

Sep 12, 2012, 07:47 AM IST

वीणा मलिक पुन्हा `नको ते करणार`?

वीणा मलिक जे नाव येताच लोकांच्या भुवया उंचावतात. प्रत्येकजण तिच्यावर टीका करताना दिसतो. पाकिस्तानी बॉम्बशेल अलीकडे खूपच चर्चेत आहे.

Aug 19, 2012, 06:13 PM IST

पाकमध्ये हिंदू मुलीचे धर्मांतर

पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम युवकाशी लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

Aug 11, 2012, 02:45 PM IST

पाकमध्ये अणु क्षेपणास्त्रांची निर्मिती जोरात

भारताला लक्ष्य करून पाकिस्तान आपल्या अणु क्षेपणास्त्रांमध्ये सातत्यानं बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशी माहिती खळबळजनक माहिती अमेरिकन काँग्रेसनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलीय.

Aug 9, 2012, 02:06 PM IST

बलुचिस्तानात हिंदू व्यापाऱ्यांचं अपहरण

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी तीन हिंदू व्यापा-यांचे अपहरण करण्यात आलं आहे. सीमेपारच्या भागात हिंदू अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Jul 31, 2012, 05:26 PM IST

पंतप्रधानांना पाकिस्तान दौऱ्याचं निमंत्रण

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकिस्तान दौऱ्याचं आमंत्रण दिलंय. झरदारी यांनी या निमंत्रणाची औपचारिकरित्या घोषणाही केलीय.

Jul 28, 2012, 11:53 AM IST

पाकिस्तानच्या टीव्हीवर दाखवलं हिंदू मुलाचं धर्मांतर

मीडिया उद्योग आर्थिक फायद्यासाठी नीतिमत्ता बाजूला ठेवून सामान्य माणसांची खिल्ली उडवू लागलं आहे. याचंच एक उदाहरण मंगळवारी टीव्हीवर पाहायला मिळालं. एका टीव्ही शोमध्ये एका इमामाद्वारे हिंदू मुलाचं धर्मांतर होत असताना थेट प्रसारीत केलं गेलं.

Jul 27, 2012, 07:33 PM IST

युद्ध... मैदानावरचं आणि मैदानाबाहेरचं

भारत आणि पाकिस्तान वैर असलं तरी आजही एकच धागा आहे जो दोन्ही देशांना जोडतो आणि तो धागा म्हणजे क्रिकेट... क्रिकेटमुळेच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत झाली. कधी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक भारतात आले. तर राहुल आणि प्रियांका गांधी मॅच पाहायला कराचीमध्ये पोहचले.

Jul 18, 2012, 10:49 AM IST

भारत-पाक मालिकेला गावस्करांचा विरोध

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तान सहकार्य करत नसताना पाकिस्तानसोबत वन डे मालिका खेळविण्यास माजी कसोटी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध केला आहे. मुंबई हल्लाच्या तपासात पाकचे सहकार्य नसताना अशी मालिका खेळविण्यावर गावस्कर यांनी टीकेची झोड उठवली आहे.

Jul 16, 2012, 08:19 PM IST

भारतीय सैन्यात घुसखोरी

सैन्यात हनीट्रॅप करत होत असलेली हेरगिरी.. भारतीय सैन्यातील एक लेफ्टनन कर्नल एका बांग्लादेशी सौंदर्यवतीच्या जाळ्यात साप़डला आणि त्यावर रॉने कारवाई केलीय.. पण हा सारा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीय तर त्या कर्नलचा लॅपटॉपही गहाळ झाला.. आणि त्या लॅपटॉपमध्ये होती सुरक्षेविषयी अतिशय महत्वाची माहीती.. या हेरगिरीचा पर्दाफाश.. भारतीय सैन्यात घुसखोरी.

Jul 12, 2012, 10:59 PM IST

काश्मीरमध्ये घुसला पाकचा सैनिक

पाकिस्तानची घुसखोरी कायम आहे. पाकमधून अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन दिले जात आहे. आता तर यावर पाकने कडी केली आहे. चक्क पाकिस्तानचा एक सैनिक भारतातच घुसला. तो कसा आला आणि का आला याची माहिती मात्र, देण्यात आलेली नाही. लष्कराच्या जवानांना या पाकिस्तानच्या सैन्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Jul 12, 2012, 05:33 PM IST

पाकच्या सोनाराने, मढवला तिरंगा सोन्याने

एका पाकिस्तानी सोनाराने भारताचा तिरंगा सोन्याने सजवला आहे आणि रत्नांनी मढवला आहे. या आपल्या कामाने हा सोनार जगात शांततेचा संदेश देऊ इच्छितो. कलीम शहरयार असं या सोनाराचं नाव आहे.

Jul 11, 2012, 04:42 PM IST

'टायगर' चालला पाकची मनधरणी करायला

याबद्दल ट्विटरवर माहिती देताना कबीर खान यांनी मात्र या गोष्टीचा दोष पाकिस्तान सरकारला न देता काही प्रसिद्ध भारतीय सिनेमांना दिला आहे. बॉर्डर, गदर यांसारख्या चित्रपटांचं नाव न घेता कबीर खान म्हणाला, “पाकिस्तानबद्दल आम्ही काहीच वाईट दाखवत नाही. पाकिस्तानचा असा गैरसमज होण्याचं कारण म्हणजे यापूर्वी बनवले गेलेले काही वाह्यात हिंदी सिनेमे हेच होय.

Jul 11, 2012, 04:06 PM IST

मुशर्रफांना ठाऊक होता लादेनचा पाकमधील पत्ता

लष्कर-ए-तोएबाचा सरदार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात दडून बसल्याची माहिती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना होती. हा खळबळजनक दावा भारत किंवा अमेरिकेकडून झाला नसून चक्क पाकिस्तानाच्या आयएसआयच्या माजी प्रमुखाने केला आहे.

Jul 10, 2012, 05:19 PM IST