पाकिस्तान

कुराणाचा अपमान; व्यक्तिला जिवंत जाळलं

कुराणाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका मानसिक विकृती असलेल्या व्यक्तिला जिवंत जाळण्याची घटना पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये घडलीय. या कृत्यात एका-दुसरी व्यक्ती सहभागी नव्हती तर पंजाब प्रांतातील हजारो लोकांनी एकत्र येऊन हे कृत्य केलंय. पोलिसांनी या घटनेची माहिती दिलीय.

Jul 5, 2012, 11:59 AM IST

आशिया कपः भारत-पाक सामना टाय

अंडर-१९ आशिया कपमधील अत्यंत चुरशीचा अंतीम सामना टाय झाल्याने अशिया कपचे जेतेपद संयुक्तपणे देण्यात आले.

Jul 1, 2012, 05:57 PM IST

सल्लूनं पाकिस्तानला दिला ‘अल्ला का वास्ता’

पाकिस्तानमधील भारतीय कैदी सरबजीतच्या सुटकेसाठी आता अभिनेता सलमान खानही पुढे सरसावला आहे. सलमाननं ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Jun 29, 2012, 05:09 PM IST

भारत तालिबानपेक्षाही जास्त धोकादायक!

पाकिस्तानातील १० पैकी केवळ ५ नागरिकांना भारत मैत्री योग्य वाटतो. तर ५ नागरिकांना भारत हा तालिबान आणि अल-कायदापेक्षाही जास्त धोकादायक वाटतो.

Jun 29, 2012, 04:35 PM IST

३२ वर्षानंतर सुरजीतसिंग मायदेशी परतला

अखेर पाकिस्तानच्या जेलमधून सुरजित सिंग यांची सुटका झाली आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर सुरजित सिंग यांनी मायभूमीत पाऊल ठेवलंय. वाघा बॉर्डरवर सुरजित सिंगांच्या स्वागतासाठी कुटुंबियांसह मित्रपरिवारांनी गर्दी केली होती.

Jun 28, 2012, 12:49 PM IST

परराष्ट्रमंत्र्यांचं पाकला आवाहन

भारतीय कैदी सरबजीत सिंगला पाकनं सोडून द्यावं, अशी मागणी आज भारत सरकारनं पाकिस्तानकडे केलीय.

Jun 27, 2012, 02:49 PM IST

'सरबजीत नव्हे, सुरजीतची होणार सुटका'

सरबजीत सिंगच्या सुटकेवरुन मध्यरात्री पाकिस्ताननं यूटर्न मारलाय. गेल्या २२ वर्षांपासून पाकिस्तानातल्या जेलमध्ये खितपत पडलेल्या सरबजीत सिंगची सुटका होणार नाही. काल रात्री उशीरा राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्याने सरबजितची सुटका होणार नसून सुरजितसिंगला सोडण्यात येणार असल्याचा खुलासा केलाय.

Jun 27, 2012, 01:17 PM IST

'पाकिस्तान आंतरराष्ट्रीय डोकेदुखी'

उग्रवादी, गरिबी आणि ढेपाळलेलं सरकार अशी अवस्था असलेलं पाकिस्तान साऱ्या जगाचंच डोकेदुखी ठरतंय, आणि अमेरिकाही इथले प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडतंय, असं म्हटलंय अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री मेडली अलब्राईट यांनी. अलब्राईट या सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

Jun 26, 2012, 10:48 AM IST

अस्थिरतेच्या गर्तेत पाकिस्तान

गिलानींना कोर्टानं अपात्र ठरवताच पुन्हा एकदा पाकिस्तानात न्यायव्यवस्था आणि लोकशाही वाद समोर आलाय. हा वाद काही आताचा नाही...झुल्फिकार अली भुट्टोपासून परवेज मुशर्रफ यांचा कोर्टाशी थेट सामना झाला आणि प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या राजकारणात नवेच अध्याय लिहीले गेलेत..

Jun 20, 2012, 11:51 PM IST

गिलानींना पद सोडण्याचे आदेश

पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना झटका दिलाय. कोर्ट अवमान खटल्यात दोषी आढळलेल्या गिलानींना अपात्र ठरवून त्यांना पद सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Jun 19, 2012, 05:04 PM IST

पाक गायिका गझला जावेदची हत्या

वायव्य पाकिस्तानातील पेशावर येथे प्रसिद्ध पश्तो गायिका गझला जावेद आणि तिच्या वडिलांची अज्ञात व्यक्तींनी गोळी घालून हत्या केली.

Jun 19, 2012, 05:00 PM IST

'पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे'

पाकिस्तानचं कुठल्याही राष्ट्राशी शत्रुत्व नसल्याचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अश्रफ परवेज कयानी यांनी एका समारंभात स्पष्ट केलं. १९७१च्या युद्धात भारतीय टँकरशी लढताना मृत्यूमुखी पडलेल्या एका पाकिस्तनी सैनिकाच्या चरित्रग्रंथाच्या उद्घाटनासाठी लष्कर प्रमुख उपस्थित होते.

Jun 12, 2012, 08:21 AM IST

पाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी

सातशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू 'हत्फ-७' या क्रूझ क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानने यशस्वी चाचणी घेतली.

Jun 5, 2012, 04:41 PM IST

पुरूषांबरोबर नाच; चार महिलांना केले ठार

पाकिस्तानमध्ये विवाह सोहळ्यात पुरुषांबरोबर नृत्य करतानाचे मोबाईलवरील चित्रीकरण पाहून जिरगा आदिवासी जमातीच्या पंचायतीने महिलांना दोषी ठरवत त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आणि त्याची कारवाईही झाली. एका लग्न सोहळ्यात पुरुषांसोबत गाणे आणि नृत्य करणे चार महिलांसाठी जिवावर बेतले आहे.

Jun 4, 2012, 08:48 PM IST

ड्रोन हल्ला : पाकमध्ये आठ दहशतवादी ठार

पाकिस्तानातील आदिवासी परिसरात आज सोमवारी पहाटे करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ संशयित दहशतवादी ठार झाले. दरम्यान, पाकिस्तानने ड्रोनने हाती घेतलेली ही मोहीम थांबविण्याचे आवाहन केले आहे.

Jun 4, 2012, 04:37 PM IST