पाकिस्तान

सईदसाठी भारताकडून पाकला ५५ कोटी

मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हफीज सईद याला भारताच्या ताब्यात दिल्यास पाकिस्तानला ५५ कोटी रुपये म्हणजेच १ कोटी डॉलर देण्याची तयारी भारताने दर्शविली आहे.

May 30, 2012, 10:42 AM IST

पाकमधल्या ऐतिहासिक हिंदू मंदिरात तोडफोड

पाकिस्तानात पश्चिम भागातल्या पेशावरमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेल्या एका मंदिरात काही अज्ञात लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना घडलीय. पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल १६० वर्षांनी या मंदिराचे दरवाजे मागच्या वर्षी उघडण्यात आले होते.

May 21, 2012, 11:56 AM IST

पाकिस्तानी क्रिकेट टीम भारतात येणार...

विस्कटलेले राजनैतिक संबंध आणि राजकीय विरोध यामुळे हद्दपार झालेलं भारत-पाकिस्तान क्रिकेट आता पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयनं पाकिस्तान संघाला आमंत्रण दिलं आहे.

May 13, 2012, 11:39 AM IST

पाक बॉम्बस्फोटात नऊ जखमी

पाकिस्तानात पश्चिम भागात असलेल्या अकोरा खट्टक शहरात सामान्य नागरिकांना आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाचा सामना करावा लागला. या बॉम्बस्फोटात पोलिस अधिकारी आणि पत्रकारांसहित नऊ जण जखमी झाले आहेत.

May 10, 2012, 01:03 PM IST

हाफीज सईदवर कारवाई करा - क्लिंटन

पाकिस्तानात लपून बसलेला आणि 26-11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांच्यावर कारवाईची अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केली आहे.

May 8, 2012, 03:19 PM IST

सानियाचा पाकिस्तानी जोडीदारास नकार

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने डबल्समध्ये पाकिस्तानी जोडीदाराबरोबर खेळण्यास साफ नकार दिलाय. इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानचा टेनिस स्टार ऐहसाम उल हक कुरैशी नव्हे तर भारताचा महेश भूपतिबरोबरच आपण डबल्समध्ये कोर्टवर उतरू, असं सानियाने स्पष्ट केलंय.

Apr 26, 2012, 09:07 PM IST

पाकचे पंतप्रधान गिलानी दोषी

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले. सर्वोच्च न्यायालयाने गिलानी यांना कलम ६३-जी अंतर्गत दोषी ठरविले आहे. आज गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, गिलानी यांना न्यायालयाने कोणतीही शिक्षा सुनाविलेली नाही.

Apr 26, 2012, 12:17 PM IST

पाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानकडे सध्या ९० ते १०० अण्वस्त्रे असल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Apr 11, 2012, 02:15 PM IST

हिना पदावरून जाईना !

पाकिस्तानी विदेश मंत्री हिना रब्बानी खार यांना पदच्युत करण्याची कुठलीही योजना नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारने दिला आहे. ही चर्चा निराधार असल्याचं पाकिस्तानच्या सरकारी प्रवक्त्याचं म्हणणं आहे.

Apr 11, 2012, 11:40 AM IST

हिना रब्बानींची मंत्रीपदावरून हकालपट्टी?

परस्परविरोधी वक्तव्य करणाऱ्या विदेश मंत्री हिना रब्बानी खार यांना दुसऱ्या विभागात पाठवून देण्याचा विचार राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी करत आहेत. अमेरिकन दुतावासाशी चर्चा करत असताना पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांच्या बोलण्यातून हा विचार डोकावला.

Apr 10, 2012, 05:14 PM IST

हिमकडा कोसळून पाकचे १३० जवान ठार

सियाचिन खोऱ्यात हिमकडा कोसळून पाकिस्तानचे सुमारे १३० जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असलेल्या खोऱ्यात घडली.

Apr 7, 2012, 08:51 PM IST

पाक सरकारच्या वेबसाइटवर 'हिंदुस्तान झिंदाबाद'

पाकिस्तान सरकारची संघीय टॅक्स लोकपालची (FTO) वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली. हॅकिंगनंतर या साइटवर ज्या प्रकारचा मजकूर दिसत आहे, त्यावरून तरी हे हँकिंग भारतीयांनीच केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mar 30, 2012, 05:32 PM IST

पाकमध्ये सात जणांची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा शहरात अज्ञात बंदूकधारी व्यक्तिंनी शिया समुदायाच्या पाच तर एका संस्थेच्या दोन पदाधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले. क्वेटा शहरात वाढत्या कारवाईमुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

Mar 29, 2012, 03:29 PM IST

लादेनच्या तीन पत्नी, पाच मुलांना कोठडी

अमेरिकेने केलेल्या कावाईत कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला असला तरी त्याच्या कुटुंबियांच्या मागील ससेमिरा सुटलेला नाही. लादेनच्या तीन पत्नी आणि पाच मुलांना न्यायालयाने कोठडी ठोठावली आहे.

Mar 19, 2012, 03:45 PM IST