बेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज

बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.

Updated: Mar 28, 2014, 03:41 PM IST

www.zee24taas.com, वृत्तसंस्था, टोकिओ
बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
जे तुकडे दिसले आहेत, त्याची लांबी आठ आणि रुंदी चार मीटर आहे, ही माहिती जपानच्या `उपग्रह इंटेलिजन्स सेंटर`ने दिलीय. गेल्या दोन दिवसांपूर्वीच थायलंड उपग्रहास पर्थमधून दक्षिण पश्चिम भागात २७०० कि.मी. अंतरावर ३०० तुकडे तरंगताना आढळले.
तसेच बुधवारी एका फ्रेंच उपग्रहास २०० कि.मी. अतंरावर १२२ तुकडे दिसल्याचे सांगण्यात आलंय. याचदरम्यान `नवीन विश्वसनीय माहिती` मिळाल्यानंतर हिंदी महासागरमध्ये बेपत्ता विमानाचे मलबा शोधण्याचे क्षेत्र बदलले गेल्याचे ऑस्ट्रेलियन अधिकाराकडून सांगण्यात आलंय.
रडारवरुन मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणावरुन, आता जुन्या क्षेत्रामधून ११०० कि.मी उत्तर पूर्व भागात मलबाची शोधमोहीम सुरु आहे असे, ऑस्ट्रेलियन सागरी सुरक्षा प्राधिकरण (एम्सा) यांनी म्हटलंय.

आठ मार्चला मलेशिया एअरलाइन्सचे विमान एमएच ३७० क्वालालांपूरवरुन बिजींगला जात असताना बेपत्ता झालं होत. त्यामध्ये २३९ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. गुरुवारी खराब वातावरणामुळे शोधमोहिम थांबवण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.