मराठा मोर्चा

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यासाठी, आरक्षणासंदर्भात ठराविक कालावधीत अहवाल द्यावा, असे आदेश मागासवर्ग आयोगास देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून 'गोल... गोल'च्या घोषणा दिल्या गेलाय. 

Aug 9, 2017, 04:40 PM IST

मराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...

मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानसभेतही उमटले. भायकळ्यातून निघालेला मोर्चा आझाद मैदानात धडकल्यानंतर मराठा समाजातील २४ सदस्यांची समिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठक नुकतीच पार पडली. 

Aug 9, 2017, 04:17 PM IST

अठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार

मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील अशी अपेक्षा आहे- शरद पवार

Aug 9, 2017, 03:12 PM IST

मराठा आरक्षणाची मागणी त्वरीत पूर्ण करावी- शिवेंद्रराजे भोसले

मराठा आरक्षणाची मागणी त्वरीत पूर्ण करावी- शिवेंद्रराजे भोसले

Aug 9, 2017, 02:55 PM IST

दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिला मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा

रितेश देशमुखसोबतच आता मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि आता नव्याने होऊ घातलेला अभिनेता रवी जाधव याने देखील या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

Aug 9, 2017, 01:51 PM IST

मराठा रणरागिणींचा एल्गार, सरकारला दिला इशारा

आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. 

Aug 9, 2017, 01:46 PM IST

मुंबईतील मराठा मोर्चाच्या भगव्या वादळाचे दोन फोटो... होताहेत व्हायरल

 मराठा क्रांती मूक मोर्चासाठी अभूतपूर्व संख्येने मराठा समाज  मुंबईत धडकला. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.  मोर्च्यापूर्वी मुंबईतील रस्ते आणि मोर्चा सुरू झाल्यानंतर भगवामय झालेले रस्ते याचे सुंदर फोटो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी काढले आहे. 

Aug 9, 2017, 01:33 PM IST