मायक्रोसॉफ्ट

Year Ender 2015 : टेक्नॉलॉजीच्या विश्वात!

२०१५ हे वर्ष मोबाईल युझर्ससाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. या वर्षात स्मार्टफोन आणखीन 'स्मार्ट' झाले. अनेक नवनव्या सुविधा ग्राहकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळाल्या... एक नजर या बदलांवर

Dec 17, 2015, 04:37 PM IST

आयआयटीच्या कँपस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांची लाखोंची भरारी

आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतलेल्या अभिनव गुप्ताला मायक्रोसॉफ्टनं किती रूपयांची नोकरी ऑफर केलीय, माहित आहे..? तब्बल 70 लाख रूपयांची... लाखो रुपये मिळकतीची नोकरी पदरात पाडून घेणारा तो एकटाच नाही... त्याच्यासारखे अनेकजण आहेत...थ्री इडियट्समधल्या फरहानसारखीच आयआयटी मुंबईतल्या अनेकांची अवस्था झालीय... कारण आयआयटीतून शिकलेल्या भोपाळच्या अभिनव गुप्ताला मायक्रोसॉफ्ट कंपनीनं चक्क 70 लाख रूपयांचं पॅकेज दिलंय...

Dec 4, 2015, 08:38 AM IST

मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर Lumia 520ची किंमत 8 मिलियन

मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत फरारीच्या 6.5 कोटीची कार LaFerrari पेक्षाही जास्त पाहायला मिळाली. कंपनीच्या बजेट स्मार्टफोन ल्युमिया 520ची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर ऑफरसह 8 मिलियन डॉलर लिहिली गेली.

Oct 19, 2015, 04:41 PM IST

'मायक्रोसॉफ्ट'ची महाराष्ट्र वासियांना खुशखबर!

क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टनं मंगळवारी केलीय. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. 

Sep 30, 2015, 08:56 AM IST

मेळघाटातलं हरिसाल होणार डिजीटल व्हिलेज

मेळघाटातलं हरिसाल होणार डिजीटल व्हिलेज

Sep 15, 2015, 09:19 PM IST

मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज १०‘ विनामूल्य उपलब्ध

  मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज टेन‘ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत संपली आहे. विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम २९  जूनला ओएस ग्राहकांना वापरासाठी उपलब्ध होईल, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलेय. सध्याचे विंडोजचे अद्ययावत व्हर्जन वापरणाऱ्यांना नवीन ओएस मोफत अपग्रेड करता येणार आहे. 

Jun 2, 2015, 12:03 PM IST

'ब्लॅकबेरी'ला कोण टेकओव्हर करणार? मायक्रोसॉफ्ट की शाओमी?

मोबाईल उत्पादक कंपनी 'ब्लॅकबेरी'ला टेकओव्हर करण्याच्या बातम्या पुन्हा एकदा टेक मीडियामध्ये येत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये कंपनी नफ्यात असूनदेखील ही कंपनी विकली जाणार, अशा आशयाच्या बातम्या दिसत आहेत.  

May 23, 2015, 05:09 PM IST

मायक्रोसॉफ्टने लॉन्च केला सर्वात स्वस्त फोन

मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त लुमिया स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. लुमिया ४३० मार्च महिन्याच जगभरात लॉन्च करण्यात आला होता. 

Apr 30, 2015, 07:39 PM IST

मायक्रोसॉफ्ट 'लुमिया ५४०' बजेट स्मार्टफोन लॉन्च

विंडोज स्मार्टफोनच्या जगात मायक्रोसॉफ्टने आणखी एक बजेट थ्रीजी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'ल्युमिया ५३०'ला मिळालेल्या यशानंतर कंपनीने 'ल्युमिया ५४०' बाजारात आणला आहे. मे महिन्यात हा फोन भारत, मध्य पूर्व आफ्रिका आणि आशिया महाखंडात विक्रिसाठी उपलब्ध होईल. 

Apr 15, 2015, 08:02 PM IST

मायक्रोसॉफ्ट देणार ग्राहकांना एमएस ऑफिस मोफत

मायक्रोसॉफ्टने आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे.  मायक्रोसॉफ्टने ग्राहकांना एमएस ऑफिस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने घोषणा केली आहे की, मोबाइल, टॅबलेट, छोट्या स्क्रिनच्या संगनकासाठी एमएस ऑफिस मोफत देण्यात येणार आहे. 

Mar 28, 2015, 05:14 PM IST

मायक्रोसॉफ्टचा सर्वात स्वस्त इंटरनेट फोन लॉन्च, किंमत 2,149 फक्त!

आपल्या दमदार ऑपरेटिंग सिस्टमसाठी जगभरात ओळखली जाणारी सर्वात मोठी ऑपरेटिंग सॉफ्टवेअर निर्माता कंपनी मायक्रोसॉफ्टने आपला सर्वात स्वस्त इंटरनेट फोन लॉन्च केलाय. नोकिया 215 ड्यूअल सिम भारतात आज लॉन्च झाला. 

Mar 19, 2015, 04:43 PM IST

अ‍ॅन्ड्रॉईड टॅब्लेटवर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मोफत

 सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील जगातील बलाढय़ कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने आपले लोकप्रिय 'वर्ड', 'एक्सेल' आणि 'पॉवरपॉइंट' अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅन्ड्रॉईड टॅब्लेटवर मोफत दिली आहेत. याचा मोठा फायदा जगातील कोटय़वधी ग्राहकांना होणार आहे. त्याचबरोबर 'आऊटलूक' ई-मेल प्रोग्राम आता आयफोन आणि आयपॅडमध्ये देऊ केला आहे.

Jan 31, 2015, 08:10 PM IST

... तर बंद होईल इंटरनेट एक्सप्लोरर!

 तुम्ही ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज १० चे युजर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर कारण मायक्रोसॉफ्ट लवकरच इंटरनेट एक्सप्लोरर ऐवजी नवा ब्राउजर आणण्याच्या तयारीत आहे. 

Dec 31, 2014, 07:52 PM IST

मायक्रोसॉफ्ट देणार फ्री इंटरनेट

मायक्रोसॉफ्ट इंडियाने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हीटीला अधिक उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात कंपनी दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेवरील खर्च कमी करण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतेही वक्तव्य आले नाही. पण सरकारची या प्रस्तावावर अनुकूल होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारने नुकतेच डिजीटल इंडिया कॅम्पेन लॉन्च केले होते. त्यामुळे सरकार याबाबत सकारात्मक विचार करू शकते. 

Nov 13, 2014, 07:27 PM IST

मायक्रोसॉफ्टनं लॉन्च केला ड्युअल सिम मोबाइल फोन ‘नोकिया १३०’

मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसनं आज दोन सिम असलेला मोबाइल फोन नोकिया-१३० लॉन्च केलाय. याची किंमत फक्त आणि फक्त १,६४९ एवढी आहे. 

Oct 27, 2014, 07:13 PM IST