मुंबई महानगरपालिका

शीतल म्हात्रे प्रकरणी पालिकेत हंगामा, पाच नगरसेवक निलंबित

शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गोंधळात सभागृह तिसर्‍यांदा गुंडाळले गेले. यावेळी विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई करीत महापौर सुनील प्रभू यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला. तसा आरोप विरोधकांनी केलाय.

Jan 22, 2014, 07:38 AM IST

मुंबई महापालिकेत ३०० नर्सची होणार भरती

मुंबई महापालिकेत ३०० नर्सची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख यांच्या अखत्यारित असलेल्या १६ उपनगरीय रूग्णालयांच्या आस्थापनेवर कंत्राटी परिचारिका या संवर्गातील ३०० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Dec 27, 2013, 08:16 AM IST

अनधिकृत बिल्डिंगच्या रहिवाशांना मोठा दिलासा, कारवाईला स्थगिती

वरळीच्या ‘कॅम्पा कोला’च्या अनधिकृत बांधकामावर आज सकाळपासून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झालीय. मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे.

Nov 13, 2013, 10:58 AM IST

मुंबई महापालिकेत भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील मुद्रालय खात्यामध्ये पे बॅंड ९३००-३४८००अधिक जीआरपी ४६०० रूपये (प्रिटींग शाखा पदवीधर उमेदवारांसाठी) ४२०० (मुद्रण पदविकाधारकांसाठी) अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेमीतील सहाय्यक व्यवस्थापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागिविण्यात आले आहेत.

Nov 13, 2013, 10:09 AM IST

महापालिकेनं नाकारली सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी!

सलग चौथ्या वर्षी मुंबई महापालिकेनं शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी नाकारलीय. यावेळीही परवानगी न दिल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.

Sep 24, 2013, 03:26 PM IST

मुंबई महापालिकेत १५ जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तीनही प्रमुख रूग्णालय आणि उपनगरीय रूग्णालयांच्या आस्थापनेवरील रक्त संक्रमण अधिकारी या संवर्गातील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

Sep 24, 2013, 12:07 PM IST

`एमएमआरडीए`चे खड्डे पालिका बुजवणार!

मुंबईत मोनो-मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात मुंबई महानगर प्रदेशिक प्राधिकरणानं (एमएमआरडीए) टंगळमंगळ केलीय. त्यामुळे आता हे काम शेवटी पालिकेनंच हाती घेतलंय.

Jul 25, 2013, 12:41 PM IST

`मुंबई तुडुंब... यात आमची काय चूक!`

पहिल्याच पावसात कोलमडलेल्या मुंबईच्या परिस्थितीचं खापर महापालिका प्रशासनानं हवामान खात्यावर फोडलंय.

Jun 25, 2013, 12:59 PM IST

सावधान… मुंबईत २४ जुलैला ‘महाभरती’!

यंदा मुंबईच्या समुद्रात तब्बल सतरा वेळा महाभरती येणार आहे. या भरत्यांच्या काळासाठी मुंबई महापालिकेनं खास खबरदारी घेतलीय.

Jun 20, 2013, 09:57 AM IST

कचरा व्यवस्थापनावर कोटींचा खर्च, पण कचरा तसाच!

मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनावर १४०० कोटी खर्च करते. मात्र कोट्यवधींचा खर्च करूनही पालिका शहरातील कचरा उचलत नाही असंच चित्र दिसतंय.

May 3, 2013, 08:51 PM IST

कॅम्पाकोलावर पाच महिन्यांनी पडणार हातोडा

मुंबईत दिवसभर चर्चा होती ती कॅम्पाकोलाची. या कम्पाऊण्डमधल्या रहिवाशांचं काय होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. प्रचंड घालमेल सुरू असताना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला. आणि पाच महिने कारवाईला स्थगिती दिली. दिवसभर हा आशा-निराशेचा खेळ सुरू होता. आणि त्याची सांगता झाली रहिवाशांनी केलेल्या जल्लोषानं.

May 2, 2013, 10:40 PM IST

मनसे वगळता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा निधी आपल्या वॉर्डकडं!

मुंबई महापालिकेच्या विकासनिधी वाटपात मनसे वगळता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सर्वाधिक निधी आपल्या वॉर्डकडं वळवलाय.

Mar 31, 2013, 06:38 PM IST

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेचा विरोध

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेनं विरोध केलाय. फेरीवाला धोरणाविरोधात सभागृहात मनसेन मुंबई महापालिका सभागृहात बॅनर्स फडकावून विरोध केला. या धोरणामुळे मुंबई बकाल होईल, असा दावा महापौर सुनील प्रभूंनी केला.

Mar 12, 2013, 10:50 PM IST

कचरा उचलण्याचं कंत्राट अबू आझमींना, मनसेचा विरोध

मुंबई महापालिकेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना कंत्राट देण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. कचरा उचलण्याचं कंत्राट अबू आझमींच्या ‘गल्फ हॉटेल कंपनी’ला देण्यात आलं आहे.

Feb 18, 2013, 07:28 PM IST

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नोंद जन्मवहीत!

बाळासाहेब ठाकरेंसह अनेक जणांच्या मृत्यूची नोंद जन्मवहीत करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण संपूर्ण मुंबईमधील स्मशानभूमींमध्ये मृत्यूवहीच उपलब्ध नाहीत.

Feb 7, 2013, 11:00 PM IST