`मुंबई तुडुंब... यात आमची काय चूक!`

पहिल्याच पावसात कोलमडलेल्या मुंबईच्या परिस्थितीचं खापर महापालिका प्रशासनानं हवामान खात्यावर फोडलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 25, 2013, 12:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पहिल्याच पावसात कोलमडलेल्या मुंबईच्या परिस्थितीचं खापर महापालिका प्रशासनानं हवामान खात्यावर फोडलंय. हवामान खात्यानं मान्सूनच्या आगमानाचा अचूक अंदाज न दिल्यानं पावसाळ्यापूर्वीच्या कामांचं नियोजन चुकल्याचं आयुक्त सीताराम कुंटे यांनी महापालिका सभागृहात दिलीय.
विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी पहिल्याच पावसात मुंबईच्या विविध भागांमध्ये पाणी साचल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या संदर्भात निवेदन केलं. त्यावर नगरसेवकांनी त्यांना सामोऱ्या जाव्या लागलेल्या समस्यांचा पाढा आयुक्तांपुढे वाचला. या निवेदनाला आयुक्तांनी उत्तर देताना हवामान खात्यावर खापर फोडलं. तसंच यापुढे ६५ मिलीलिटर पाऊस झाला आणि समुद्राला ४.५ मीटर भरती आली तर मुंबईत पाणी साचण्याची समस्या निर्माण होणारच, अशी हतबलताही व्यक्त केली. मुंबईत पावसात कुठेही पाणी साचणार नाही, असा दावा महापालिकेनं कधीही केलाच नव्हता, असंही आयुक्तांनी म्हटलंय.

सखल भागात पाणी साचू नये यासाठी पंपाद्वारे पाणी उपण्याची यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी नगरसेवकांना दिली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.