राजकारण

अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून शह काटशाहचं राजकारण

अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून आता राज्यात जोरदार शह काटशाहचं राजकारण सुरु झालंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्र्यांनी आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आता काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राधाकृष्णविखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, उपस्थित होते.

Aug 2, 2016, 04:22 PM IST

बाळासाहेब मला राजकीय वारसदार समजायचे : जयदेव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जयदेव ठाकरे यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्याला त्यांचा राजकीय वारसदार समजायचे, असा दावा जयदेव यांनी आपल्या साक्षीत केला आहे. 

Jul 20, 2016, 08:29 AM IST

एक्सक्लुझिव्ह : महाराष्ट्रातला आरोप आणि राजीनाम्याचा इतिहास

राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे सध्या आरोपांच्या फेऱ्यात आहेत. विरोधक खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यापूर्वीही राज्याच्या राजकारणात आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची उदाहरणे आहेत. याच उदाहरणांचा दाखला देत खडसे राजीनामा का देत नाहीत? असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहेत.

Jun 3, 2016, 08:28 PM IST

राजकारणानंतर आता 'बॉलिवूड'मध्ये एन्ट्री...

राजकारण आणि बॉलिवूड... तसं पाहिलं तर ही दोन्ही क्षेत्रांची टोकं वेगवेगळी... अनेक कलाकार राजकारणात येतात तसेच काही राजकारणी सिनेमासृष्टीत येत आहेत. आता त्याता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचीही भर पडलीय... सिब्बल लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

Jun 3, 2016, 08:21 PM IST

इंदिरा गांधींना काय वाटायचं सून मनेकांबद्दल?

संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मनेका गांधी यांनी राजकारणामध्ये आपली मदत करावी अशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची इच्छा होती.

May 12, 2016, 05:04 PM IST

राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा सागर- गडकरी

राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा सागर असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गमतीनं म्हटलंय.

Mar 26, 2016, 10:44 PM IST

देशभरातील राजकारण्यांमध्येही आज होळीचा उत्साह

मुंबई : एरवी राजकारणाच्या रंगांत रंगणाऱ्या राजकारण्यांनी आज देशभरात उत्साहात होळी साजरी केली.

Mar 24, 2016, 05:00 PM IST

भुजबळांचा प्रवास... शिवसैनिक ते तुरुंग!

छगन भुजबळ यांची अटक राज्याच्या राजकारणातील एक सगळ्यात मोठी घटना मानली जात आहे. आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीला अटक होण्याची राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे. या अटकेने भुजबळ नावाचा राज्याच्या राजकारणात मागील पाच दशके असलेला दबदबाही मावळतीकडे झुकू लागलाय.

Mar 15, 2016, 10:04 AM IST