रायगड

कोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Jun 9, 2013, 10:22 AM IST

करा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।

Jun 6, 2013, 10:46 AM IST

रायगडावर महाराजांचा ३४०वा राज्यभिषेक दिन साजरा

रायगडावर आज शिवाजी महाराजांचा ३४० वा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं

Jun 6, 2013, 10:34 AM IST

माफियांचा धुमाकूळ, तहसीलदारांच्या पथकावर हल्ला

रायगड जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा धुमाकूळ सुरू केलाय. म्हसळा तालुक्यातल्या आंबेतमध्ये अवैध वाळू उपसा रोखणा-या तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय.

Feb 14, 2013, 01:07 PM IST

वाट चुकलेल्या बिबट्याचा ११ तासांचा धुमाकूळ...

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या बोर्ली या गावात जवळजवळ ११ तास धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलंय. त्यामुळे नागरिकांच्या जीवात जीव आलाय.

Feb 9, 2013, 06:20 PM IST

रायगडाला जेव्हा `भाव` येतो!

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना, बिल्डरांचं लक्ष आता रायगडकडे लागलं आहे. रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध आहेत, आणि त्यांना भावही चांगला मिळू शकतो, हे लक्षात येताच बिल्डरांनी ‘रायगडा’वर स्वारी करण्यास सुरूवात केली आहे.

Jan 31, 2013, 06:11 PM IST

‘चवदार’ तळ्याची चव अन् स्मारकाची रया गेली!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील सरकारचं बेगडी प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून स्मारक उभारायचं आणि त्याकडे नंतर पाठ फिरवायची...

Jan 29, 2013, 03:20 PM IST

'वाघ्या' उखडून इतिहास बदलतो का?

सुरेंद्र गांगण

मी गेले कित्येक वर्षे ऊन, पावसात चबुदऱ्यावर जागच्या जागी बसून आहे. माझा कोणाला उपद्रव नाही. मात्र, असे असले तरी मी काहींच्या डोळ्यात खुपलो. १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी

Aug 9, 2012, 01:43 PM IST

तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रात तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू झालाय. हे तिघंही पिंपरी चिंचवडच्या वायआयटी कॉलेजचे प्राध्यापक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 10, 2012, 10:37 PM IST

शहिदाच्या मात्या-पित्याची वणवण

एकुलता एक मुलगा शहीद झाला, तेव्हा वीरमरण आलेल्या मुलाचं स्मारक बांधण्यापासून घरापर्यंत पक्का रस्ता बांधण्याची मोठ-मोठी आश्वासनं नेत्यांकडून देण्यात आली. प्रत्यक्षात वृद्ध माता-पित्यांना घरी जाण्यासाठी पायवाटही उरलेली नाही.

May 18, 2012, 04:24 PM IST

रायगडात कागदी धरण, खर्च १०० कोटी

रायगड जिल्ह्यातली सिंचनाच्या गौडबंगालाची एक कथा आहे... यामध्ये 100 कोटी रुपयांच्या धरणात एकही थेंब पाणी साठलेलं नाही.

May 17, 2012, 09:16 AM IST

पर्यटकांनी केली गणेश मृर्तीची चोरी

रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या सुवर्णगणेश मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीये. चोरटे पर्यटक म्हणून आले आणि चोरी करुन गेले अशी माहिती समोर येत आली आहे.

May 5, 2012, 12:33 PM IST

दिवेआगर चोरी : चोरांचा लागला छडा

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Apr 25, 2012, 09:46 AM IST

दिवेआगर चोरी : गुजरातमधून प्रमुखाला अटक

दिवेआगारमधील सुवर्णगणेमूर्ती चोरीप्रकरणी गुजरातमधून मुख्य संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलय. याशिवाय औरंगाबादमध्येही सात जणांची चौकशी सुरू आहे. हे सातही जण फासेपारधी आहेत.

Apr 21, 2012, 10:06 AM IST

रायगडात पाण्याचा दुष्काळ

दुर्गम भागातील महादेवाचा मुरा या गावाची व्यथा तर कुणाच्याही -हदयाला पाझर फोडेल अशीच आहे...इथं लोकवस्ती आहे पण रस्ते नाहीत..रस्ते नाहीत त्यामुळे कोणत्या सुविधाच गावात पोहचल्या नाहीत. रामभरोसे जीवन जगणा-या इथल्या गावक-यांना जणू शासनानं वाळीतच टाकलंय. त्यात भरीस भर म्हणून की काय पाणीटंचाईचं अस्मानी संकट गावक-यांवर कोसळलयं. खरं तर ही समस्या आजची नाही..पिढ्यानं पिढ्या इथं पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पण ना त्याची राजकारण्यांना तमा, ना शासकीय अधिका-यांना....जिथं यंत्रणेलाच पाझर फुटत नाही तिथे निसर्गच मदतीला धावून येतो आणि इथल्या दगडालाही पाझर फुटतो.

Apr 13, 2012, 09:55 AM IST