रेल्वे प्रवास

रेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू

रेल्वेने आपला गल्ला जमविण्यासाठी छुपा अजेंडा लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट रद्द करावयाचे असेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम आपल्या हातात तोकडीच पडेल. त्यामुळे प्रवास करण्याचे पक्के झाले तर तिकिट काढा आणि पैसे वाचवा.

Nov 13, 2015, 10:48 AM IST

रेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधी आरक्षण करता येणार

दिवाळीच्या निमित्तानं रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. आता रेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधीही आरक्षण करता येणार आहे.

Nov 11, 2015, 12:32 PM IST

दिवाळीसाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचा दागिण्यांसाठी गुंडाकडून रेल्वेत खून

दिवाळीसाठी माहेरी जाणाऱ्या आईवर जीवघेणा हल्ला दोन गुंडानी केला. यात तिचे निधन झाले. जिल्हयातील पिंगळी रेल्वे स्थानकावर लूटमार करण्यासाठी आलेल्या दोन गुंडांनी दागिन्यांसाठी महिलेचा खून केला. या महिलेने गळ्यातील आपले दागिने न दिल्याने तिचा गळा चिरून त्यांनी खून केला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडला. दरम्यान, रेल्वेप्रवासी आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

Nov 11, 2015, 10:58 AM IST

Video तुमची चालत्या रेल्वेत कोणी छेडकाढली तर....

तुम्ही लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करत आहात. त्याचवेळी काही गुंड किंवा दारुडे तुमच्या डब्यात चढलेत तर..तुम्ही घाबरुन जाऊ नका. थोडा धीर जमवा आणि ही युक्ती करा. त्यामुळे तुम्ही चांगला प्रवास करु शकता.

Oct 17, 2015, 04:06 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी खूष खबर, वेटींगवाल्यांना विमान तिकीट

रेल्वे प्रवाशांसाठी एक खूष खबर आहे, आयआरसीटीसीच्या प्रवाशांना. ज्यांचं तिकीट वेटींगवर असेल त्यांना विमानाचं तिकीट रेल्वे ऑफर करीत आहे. 

Jun 10, 2015, 09:57 AM IST

मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर, बंम्बार्डिअर ट्रेन धावणार

मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर, बंम्बार्डिअर ट्रेन धावणार

Feb 6, 2015, 09:04 AM IST

मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर, बंम्बार्डिअर ट्रेन धावणार

मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी एक खुशखबर. गेली काही महिने चाचण्या सुरु असलेल्या बंम्बार्डिअर (bombardiar) कंपनीच्या लोकल ट्रेनला रेल्वे बोर्डानं हिरवा झेंडा दाखवलाय. 

Feb 5, 2015, 07:45 PM IST

'कोरे'चा प्रवास : सिग्नल यंत्रणेत बिघाड, काही गाड्या रद्द

 ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झालाय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराकडे निघालेल्या कोकणवासियांचे अतोनात हाल होतायत. त्यातच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास कटकटीचा झालाय. आज अनेक गाड्या पाच ते सहा तास उशिरा धावत अाहेत. जनशताब्दी एक्सप्रेस ठाणे स्थानकात दोन तास रोखून धरण्यात आली होती.

Aug 27, 2014, 07:49 AM IST

कोकण रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा, एकेरीमार्गामुळे कोंडी

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे विघ्न काही केल्या संपण्याच्या मार्गावर नाही. खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे सात डब्बे घसल्याने तब्बल २५ तास वाहतूक ठप्प होती. तर त्याआधी नव्याने सुरु झालेली डबल डेकर ट्रेन रोह्याजवळ मध्य आणि कोरेच्या वादामुळे एकतास उभी करण्यात आली होती. आता तर अनेक गाड्या जादा गाड्या सोडल्यामुळे एकेरीमार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा झालाय.

Aug 26, 2014, 02:10 PM IST

मुंबईकरांच्या तोंडाला फुसली पाने

 मोठा गाजावाजा करत दिल्लीत गेलेल्या खासदारांना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी गाजर दाखविले. मुंबईकर पासधारकांना कोणताही दिलासा नाही. पासच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे पासधारकांनाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.14.2 टक्के भाडेवाढ राहणार आहे. ही दरवाढ 28 जूनपासून लागू होणार आहे.

Jun 24, 2014, 10:20 PM IST

कोकण रेल्वेचा प्रवास आता कूल कूल

कोकण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे. गर्दी आणि उन्हाळा यापासून सुटका होण्यासाठी आता कोकण रेल्वेने जादा डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेही एसी डबे जोडण्यात येणार आहेत. दादर-मडगाव-दादर जनशताब्दीला तीन तर दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणीला दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 2, 2014, 10:23 AM IST