आता रेशनदुकानात आधारकार्ड सक्तीचे
रेशन दुकानावर स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठी आधार नंबर बंधनकारक करण्यात आलंय. केंद्र सरकारनं गुरुवारी यासंदर्भातले निर्देश जारी केले. दरम्यान ज्या रेशनकार्ड धारकांकडे आधार नंबर नाही, अशांना येत्या 30 जूनपर्यंत अर्ज करून आधार कार्ड काढण्याची मुदत देण्यात आली आहे.
Feb 10, 2017, 08:28 AM ISTराज्यात एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2016, 07:31 PM ISTराज्यात एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस
राज्यात तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलीय. आशारसोबत रेशन कार्ड जोडल्यामुळं बोगस कार्डबाबतची माहिती समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस कार्ड्सचा आकडा दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलीय.
Dec 7, 2016, 03:37 PM ISTरेशन कार्ड लवकरच मिळणार ऑनलाईन
रेशन-कार्ड म्हटलं की, तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, पण आता रेशन कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. याची सुरूवात मुंबईतील गोरेगाव आणि विक्रोळीभागापासून झाली आहे.
Jun 1, 2016, 10:23 AM ISTबोगस रेशन कार्ड देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई
रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणीचं काम झाल्यानंतर, बोगस रेशन कार्ड धारकांवर कारवाई करण्यात येईल, बोगस रेशन कार्ड देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागातले काही अधिकारी मदत करत असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिलं.
Apr 12, 2016, 08:06 PM ISTयापुढे रेशन कार्ड हा निवासी पुरावा नाही
रेशन कार्ड हे निवासी पुरावा म्हणून आता या पुढे कोणत्याही सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयात यापुढे चालणार नाही. याबाबत परिपत्रक काढून अन्न आणि पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी कोणत्याही कामासाठी आपण सर्व प्रथम रेशन कार्डाचाच वापर करायचो, आता मात्र हे चित्र बदलणार आहे.
Nov 22, 2015, 08:40 PM ISTपाहा कोणाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही
तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल, तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही. पुरवठा विभाग या संदर्भात पुढच्या आठवड्यात एक सर्वेक्षण करत आहे. त्यात पात्र अपात्र लाभार्थींची नव्यानं यादी तयार करण्यात येत आहे.
Oct 15, 2015, 09:27 PM ISTरेशनिंगच्या मालाचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात
रेशनिंगमध्ये अनेक ठिकाणी माफियाराज पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेकांचं धान्य आणि साखर परस्पर बाजारात विकली जातेय, या माफियांना आळा घालण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून रेशनिंग कार्ड थेट आधारकार्डला लिंक अप करण्याचं काम सुरू आहे.
Nov 19, 2014, 07:07 PM ISTसोनाक्षी आणि किरण खेर घेतायेत सब्सिडीतील धान्य!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण खेर जर उत्तराखंडच्या गावात सब्सिडीवालं धान्य रांगेत लागून घेत असले तर... हो असं घडतंय उत्तराखंडच्या रुडकी या गावात.
Oct 17, 2014, 02:02 PM ISTरेशनकार्ड मान्य, पण मिळत नाही धान्य
राज्यात दुष्काळामुळं जनता त्रासलीय. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण असह्य झालेल्या अनेकांनी मुंबईची वाट धरलीय. पण इथेही त्यांच्या नशिबी अवहेलनाच आलीय. दुष्काळाला कंटाळून नवी मुंबईत आलेल्या लोकांना शासनान रेशनकार्ड दिलं खरं पण त्या कार्डावर धान्यच मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.
Jun 5, 2012, 09:22 AM IST