वेस्ट इंडिज

सचिनची विकेट काढणाऱ्या शिलिंगफोर्डच्या खेळण्यावर बंदी!

नुकतीच झालेली, सचिनची १९९ टेस्ट आठवतेय... या टेस्टमध्ये शिलिंगफोर्डनं सचिनची विकेट काढली होती. हाच शिलिंगफोर्ड आता त्याच्या बॉलिंगच्या शैलीमुळे अडचणीत आलाय.

Dec 17, 2013, 11:20 AM IST

भारताचा सीरिजवर ताबा; धवनची शानदार सेंच्युरी!

कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली.

Nov 27, 2013, 08:07 PM IST

भारताचा पराभव, विंडीजनं मालिकेत साधली बरोबरी!

विशाखापट्टणम वन-डेमध्ये रंगतदार लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर दोन विकेट्सनी मात केली.

Nov 24, 2013, 11:35 PM IST

कोहलीची ‘विराट’ कामगिरी, वन डेमध्ये पूर्ण केली पाच हजारी

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये कोच्ची इथं झालेल्या वन डे मॅचमध्ये दोन नवे रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत. एकीकडं रवींद्र जडेजानं यंदाच्या सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड केलाय. तर सर्वात वेगानं पाच हजार धावा करण्याचा विक्रम विराटनं स्वत:च्या नावावर करुन घेतला आहे. हा टप्पा ओलांडणारा विराट दहावा फलंदाज ठरला आहे.

Nov 22, 2013, 03:22 PM IST

विंडिजवर भारताची मात, रोहित-विराट विजयाचे शिल्पकार

विंडिजविरुद्धच्या पहिल्याच वन-डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट्सने विजय साकारत सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली विजयाचे शिल्पकार ठरले. ८६ रन्सची धुवाँधार इनिंग खेळणा-या कोहलीला `प्लेअर ऑफ द मॅच`ने गौरवण्यात आल.

Nov 21, 2013, 10:00 PM IST

<b><font color=red>SCORE :भारताचा विंडिजवर सहज विजय</font></b>

टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजला हरवल्यानंतर आणि सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर आज भारत-वेस्ट इंडिज पहिली वन डे मॅच कोच्ची इथल्या नेहरु स्टेडियमवर सुरू झालीय. वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 21, 2013, 02:16 PM IST

टीम इंडियाचा सचिनला विजयी निरोप, डावाने विजयासह मालिका २-० ने खिशात

टीम इंडियाच्या सामीने शेवटची विकेट काढली आणि वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश मिळाला. भारताने कसोटी मालिका जिंकली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी १ डाव आणि १२६ धावांनी जिंकत ही मालिका २-० अशी जिंकत सचिनला विजयी निरोप दिला. मालिका जिंकल्याचा उत्साह दिसून आला नाही तर सचिनच्या निरोपासाठी भावून झालेल्या प्रेक्षकांचा दिसला.

Nov 16, 2013, 02:04 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर... सचिन रमेश तेंडुलकर!

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत महान बॅट्समन सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ आपल्या पारंपरिक गणवेशाला फाटा देत चक्क सचिन रमेश तेंडुलकर २०० वी टेस्ट असं छापलेली जर्सी तयार केली आहे.

Nov 14, 2013, 10:35 PM IST

स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, वानखेडे टेस्ट

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजची वानखेडे टेस्ट मॅचला गुरुवारपासून सुरूवात झालीय. ही सचिनची २०० वी आणि अखेरची टेस्ट मॅच आहे... त्यामुळे या मॅचमध्ये सगळ्यांच्या नजरा खिळल्यात त्या एकट्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर...

Nov 14, 2013, 09:16 PM IST

कोलकाता टेस्ट : <b>टीम इंडियाचा एक डाव, ५१ धावांनी दणदणीत विजय</b>

कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडीयाने एक डाव आणि ५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मोहम्मद शमी विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पदार्पणातच घेतल्या ९ विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयात फलंदाजांची साथ मिळाली. रोहित शर्माची १७७ धावांची झुंझार खेळी, तर अश्वीनच्याही १२४ धावा हे या कसोटीचे वैशिष्ट ठरलं.

Nov 8, 2013, 06:22 PM IST

रोहितचे शतक, भारताच्या ६ बाद ३५४ धावा

भारताच्या रोहित शर्माने पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत चांगली भागिदारी केली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३५४ धावा करत, वेस्ट इंडिजवर १२० धावांची आघाडी घेतली. रोहितला चांगली साथ देत आर. आश्विनने नाबाद ९२ धावा केल्या आहेत. तोही आता शतकापासून ८ पावले दूर आहे.

Nov 7, 2013, 05:03 PM IST

शिलिंगफोर्डनं घेतला सचिनचा बदला!

कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सुरू असलेली वेस्ट इंडिज विरुद्ध भारताची टेस्ट मॅचची उत्सुकता प्रचंड ताणली गेली होती... पण,

Nov 7, 2013, 10:47 AM IST

सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी कडेकोट बंदोबस्त

सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचसाठी मुंबई पोलीसही सज्ज झालेत. या टेस्ट मॅचसाच्या सुरक्षा संदर्भात मुंबई पोलिसांच्य स्पेशल टीमनं एमसीए बरोबर एक बैठकही केलीये. या बैठकीत सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचच्या सुरक्षे संबंधी महत्वपूर्ण चर्चा झाली

Nov 6, 2013, 10:47 PM IST

सचिनची कसोटी, भारत-वेस्ट इंडिज ईडन गार्डनवर भिडणार

`सिटी ऑफ जॉय` अशी ओळख असलेल्या कोलकात्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पहिली टेस्ट रंगणार आहे. नुकतीच कांगारुविरुद्ध वन-डे सीरिज जिंकलेल्या टीम इंडियाचं पारड वेस्ट इंडिजच्या तुलनेत जड वाटत आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरची ही १९९वी टेस्ट असणार आहे. म्हणूनच ही टेस्ट ऐतिहासिक ठरणार आहे.

Nov 5, 2013, 06:53 PM IST

... आणि सचिन नाराज झाला

मास्टर ब्लास्टरच्या ईडन गार्डनवरील अखेरच्या मॅचसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं (कॅब) जय्यत तयारी केलीय. मात्र १९९व्या टेस्टच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या तयारीवर सचिन तेंडुलकर नाराज झालाय. वेस्टइंडिज सोबत दोन टेस्ट मॅचपैकी पहिली मॅच ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन वर सुरू होतेय.

Nov 5, 2013, 08:47 AM IST