शरद पवार

दिल्लीत NCPची महत्वाची बैठक

दिल्लीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणा-या आणि राज्यात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वपूर्ण बैठक होत आहे. दिल्लीत होणा-या बैठकीत शरद पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Jul 22, 2012, 07:22 PM IST

‘बंधुत्व’ आणि ‘मित्रत्व’

प्रसाद घाणेकर

ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांनी अनेक शक्यतांच्या फटाक्यांची आतषबाजी करत चर्चेला तोंड फोडलं. मग पिंपळपारावरील बैठक तरी कशी मागे राहील. पिंपळपारावरच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटू लागले. आणि त्यांनी विषय निवडला ‘हे मित्रत्व आणि हे बंधुत्व’.

Jul 22, 2012, 04:39 PM IST

नेमकं काय हवंय शरद पवारांना...

आपली नाराजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. या पत्रातून शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या तीन मागण्याही मांडल्यात. यातलीच एक मागणी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कार्यशैलीत बदल घडवण्याच्या सूचना करणं.

Jul 20, 2012, 09:29 PM IST

पवारांची नवी खेळी, राजीनामा दिलाच नाही

केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. गेले दोन दिवस पवार नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. मात्र शरद पवार हे राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती.

Jul 20, 2012, 12:52 PM IST

शरद पवार नाराज, राजीनामा देण्याची शक्यता!

ज्येष्ठताक्रमात डावलल्याने शरद पवार केंद्र सरकारवर नाराज आहेत. ज्येष्ठताक्रमात पवारांना डावलून अँथोनी यांना दुसरा क्रमांक दिल्यामुळे शरद पवार नाराज झाले आहेत. क्रमांक दोनसाठी पवारांचा संघर्ष चालू असल्याचं सांगितलं जात आहे. प्रफुल्ल पटेलांनीही राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Jul 19, 2012, 10:25 PM IST

पवार... 'दी पॉवर गेम'

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जींनी काल मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानले. प्रणवदांच्या या भेटीमुळे भाजपमधील अस्वस्थता वाढलीए. पण दुसरीकडे शरद पवारांनीही ही भेट घडवून शिवसेनेशी आपली मैत्री अधिक घट्ट केलीए.

Jul 14, 2012, 09:08 AM IST

मुखर्जी-पवार घेणार शिवसेनाप्रमुखांची भेट

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रात्री आठ वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे.

Jul 13, 2012, 08:52 AM IST

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

काही दिवसांपूर्वी पावसाची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगून दिलासा देणा-या कृषी मंत्री शरद पवारांनी आता मात्र महाराष्ट्र, कर्नाटकातील कमी पाऊस ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलंय.

Jul 11, 2012, 10:35 PM IST

सोमय्यांनी ठोठावलं पंतप्रधान कार्यालयाचं दार

किरीट सोमय्या यांनी येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील सहा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर आणण्याचा दावा केलाय. महाराष्ट्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्या जमिनीच्या सात बाराचे उतारे किरीट सोमय्यांनी पंतप्रधानाच्या कार्यालयात दिले. इतके पुरावे असूनही का कारवाई होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

Jul 11, 2012, 11:14 AM IST

पवार काका-पुतणे तटकरेंचे पाठीराखे!

राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर होणा-या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तटकरेंची पाठराखण केली आहे.

Jul 6, 2012, 08:12 PM IST

शरद पवार विश्वासघातकी, 'अर्जुना'चा नेम

स्वर्गीय काँग्रेस नेते अर्जुनसिंग यांनी आपल्या पुस्तकात शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार हे विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत, असं त्यांचं मत होतं. काँग्रेस पवारांसोबत संबंध पूर्णपणे कधी तोडणार याचीच अर्जुनसिंग वाट पाहात होते.

Jul 5, 2012, 01:08 PM IST

मान्सूनची परिस्थिती चिंताजनक नाही - पवार

मान्सूनच्या उशीरा आगमनामुळं देशातली परिस्थिती फारशी चिंताजनक नसल्याचा निर्वाळा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय. येत्या आठवड्यात मान्सून सक्रीय होईल आणि शेतीची चिंता मिटेल असा आश्वासक आशावाद शरद पवार य़ांनी व्यक्त केला.

Jul 3, 2012, 12:43 PM IST

शरद पवारांनी मंत्रिगटाचे अध्यक्षपद सोडले

टेलिकॉम मंत्रिगटाच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार पायउतार झाले आहेत. याबाबतची विनंती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली होती. पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी ही विनंती केली होती. पंतप्रधानांनी ही विनंती मान्य केलीय..

Jul 2, 2012, 09:30 PM IST

NCPच्या मुंबई अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी संजय दिना पाटील आणि किरण पावसकर यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. संजय दिना पाटील यांना जास्त मतं मिळाली मात्र अजितदादा आणि काही नेत्यांनी किरण पावसकर यांच्या नावाचा आग्रह धरला.

Jun 29, 2012, 11:11 PM IST

मंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!

भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2012, 04:04 PM IST