सोमय्यांनी ठोठावलं पंतप्रधान कार्यालयाचं दार

किरीट सोमय्या यांनी येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील सहा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर आणण्याचा दावा केलाय. महाराष्ट्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्या जमिनीच्या सात बाराचे उतारे किरीट सोमय्यांनी पंतप्रधानाच्या कार्यालयात दिले. इतके पुरावे असूनही का कारवाई होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

Updated: Jul 11, 2012, 11:14 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

किरीट सोमय्या यांनी येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रातील सहा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर आणण्याचा दावा केलाय.

 

महाराष्ट्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्या जमिनीच्या सात बाराचे उतारे किरीट सोमय्यांनी पंतप्रधान कार्यालयात दिले. इतके पुरावे असूनही का कारवाई होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अजून एका मंत्र्याच्या भ्रष्टाचारासंदर्भातले कागदपत्रे दिल्याचंही त्यांनी सांगितले. सुनील तटकरे यांना शरद पवारांनी क्लिन चीट दिल्याच सांगितलं असता किरीट सोमय्या यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयात दिलेले पुरावे तपासून घ्यावेत, त्यानंतर त्यांची झोपमोड होइल असं मत त्यानी व्यक्त केलं. महाराष्ट्रात झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी मंत्रालयात पुरावे देउनही कारवाई न झाल्याने म्हणून पंतप्रधान कार्यालयात पुरावे दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय. १४ दिवसांत कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यानी दिलाय. आदर्श प्रकरणातील कागदपत्रंही त्यानी पंतप्रधान कार्यालयात दिले आहेत. आणि याप्रकरणाही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यानी केलीये.