शेअर बाजार

देशात स्थिर सरकार आशेने शेअर बाजारात उत्साह

सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर देशात स्थिर सरकार येईल या आशेनं शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय. सलग तिस-या दिवशी सेन्सेक्स वधारल्याचं दिसतंय.

May 13, 2014, 10:49 AM IST

शेअर बाजारात असलेली तेजी कायम

शेअर बाजारात असलेली तेजी कायम आहे. आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकानं 23 हजारांचा टप्पा पार केला. मात्र काही वेळातच त्यात थोडी घसरण झाली आणि 22994 अंशांवर बंद झाला.

May 9, 2014, 10:26 PM IST

शेअर बाजाराची उच्चांकी भरारी

बाजाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सनं भरारी घेत 22 हजाराचा उच्चांकी आकडा गाठला आहे. शेअर बाजाराचा हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी आकडा ठरला आहे.

Mar 10, 2014, 01:20 PM IST

रुपयाचं पतन सुरूच; गाठली सर्वांत खालची पातळी!

थोडाफार सावरतोय अशी चिन्हं दिसता-दिसताच रुपया पुन्हा एकदा धडामदिशी खाली आदळलाय. मंगळवारी शेअरबाजार आणि रुपयाच्या मूल्यासाठी अनलकी ठरलाय.

Aug 27, 2013, 12:38 PM IST

रूपयाबरोबरच शेअर बाजार कोसळला

डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण झाल्याने याचा परिणाम शेअर बाजारावर झालाय. शेअर मार्केट कोसळले आहे. सेंसेक्स सुरूवातीला ९८ पैशांनी घसरला. तर रूपयाचे मूल्य ६४ वर पोहोचलेय.

Aug 20, 2013, 01:13 PM IST

रुपया घसरला, बाजार कोसळला!

सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच बाजाराला चांगलाच दणका बसलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण होतेय. रुपयाच्या घसरणीमुळं त्याचा परिणाम सेंसेक्सवरही झालाय. शेअर बाजार सकाळच्या पहिल्या सत्रात तब्बल २०० अंशांनी घसरलाय.

Aug 19, 2013, 10:07 AM IST

रूपया घसरला : सोने ३० हजारी पार, बाजार गडगडला

घसरणाऱ्या रुपयाला टेकू देण्यासाठी आणि वित्तीय तूट कमी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क वाढविल्याने सोने दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी १०९४ रूपयांनी वाढ होऊन सोने ३०४१२ प्रति तोळा झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया ६२ रूपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झालाय. बाजार कोसळला आहे.

Aug 16, 2013, 10:53 AM IST

अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम

यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांनी केलेल्या तरतुदींना शेअर बाजाराने थंड प्रतिसाद दिला आहे. अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजार घसरला होता. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार काही प्रमाणात वधारला.

Feb 28, 2013, 03:59 PM IST

शेअर बाजारात तेजी

गेले काही महिने मंदीच्या सावटाखाली असणारा शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने २०,००० हजारापर्यंत उसळी मारली. दरम्यान, आज १९,९६५.४६ वर मार्केट खुले झाले.

Jan 16, 2013, 12:12 PM IST

पासवर्ड श्रीमंतीचा- 25 ऑगस्ट 2012

शेअरबाजारातले ऑटो, FMCG म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन क्षेत्र आणि हेल्थ केअर हे सेक्टर्स सरत्या आठवड्यात तेजीत होते. तर बॅका, कॅपिटल गुड्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, आयटी, मेटल, ऑईल एण्ड गॅस, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि टेक के या क्षेत्रात मंदीसदृष्य वातावरण होतं.

Aug 26, 2012, 12:03 AM IST

या आठवड्यातील शेअर बाजार

शेअरबाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांना इच्छा असते, पण त्याबाबत प्रत्येकाला माहिती असतेच असे नाही. चुकीच्या किंवा अपु-या माहितीअभावी केलेली गुंतवणूक जोखमीची असते. ते टाळण्यासाठी शेअरबाजारासंबंधी महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना मी आपल्याला समजावून सांगतो.

Jun 4, 2012, 04:13 PM IST

काय घडलं आज शेअरबाजारात

मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज १६ हजार २६ अंशांवर बंद झाला. त्यात १५६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज ४ हजार ६८० अंशांवर बंद झाला.

May 22, 2012, 06:15 PM IST

पासवर्ड श्रीमंतीचा

आता आपण सेन्सेक्स आणि इतर निर्देशांक म्हणजे काय? हे जाणून घेणार आहोत. इंडेक्स किंवा निर्देशांक म्हणजे बाजारातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीतील चढउतार सांगणारा अंक.

May 19, 2012, 04:12 PM IST

आजचा सेंसेक्स

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 151 अंशांवर बंद झाला. त्यात दीडशे अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 188 अंशांवर बंद झाला. त्यात 50 अंशांची घट झाली.

May 3, 2012, 06:18 PM IST

आजचा सेंसेक्स

मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 134 अंशांवर बंद झाला. त्यात फक्त 3 अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 190 अंशांवर बंद झाला. त्यात फक्त दीड अंशांची वाढ झाली.

Apr 27, 2012, 07:18 PM IST