सुप्रिया सुळे

२०२८ पर्यंत लोकसभाचः सुप्रिया सुळे

आपण केवळ आगामी लोकसभाच नव्हे तर २०२८ पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय

Oct 16, 2012, 01:10 PM IST

महिला सीएमचे मनावर घेऊन नका - शरद पवार

महिला मुख्यमंत्रीपदाचं गांभिर्याने घेऊ नका, असा सल्ला माध्यमांना दिलाय तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. कालच गोंदियात याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं.

Oct 14, 2012, 08:07 PM IST

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध?

महिला मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असं वक्तव्य केलय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी. गोंदियात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मत मांडलय.

Oct 13, 2012, 08:42 PM IST

टगेगिरीनंतर आता ताईगिरी

माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची टगेगिरी सर्वांनाच माहित झाली आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या ताईंची अरेरावी ही दिसून आली. खासदार सुप्रिया सुळेंची ताईगिरी येथे दिसली.

Oct 12, 2012, 04:12 PM IST

शरद पवारांचे सर्वकाही लेकीसाठी

गुजरातमधील बडोद्यात NCPच्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसला घटक संघटनेचा दर्जा दिला. त्यासाठी पक्षाच्या घटनेत तशी दुरूस्तीही करण्यात आली.

Oct 10, 2012, 07:02 PM IST

अजितदादा मुख्यमंत्री व्हावेतः सुप्रिया सुळे

अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल अशी इच्छा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलयं. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्यात सुप्रिया ताईंनी जाहीर वक्तव्य केलयं.

Oct 2, 2012, 05:52 PM IST

अजितदादांचा राजीनामा मंजूर होणार- शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात येणार असून अजित पवार यांनी एक धाडसी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केली.

Sep 26, 2012, 06:02 PM IST

राज्याच्या राजकारणात परतणार नाही - सुप्रिया सुळे

राज्याच्या राजकारणात परतण्यास उत्सुक नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

Sep 26, 2012, 05:18 PM IST

सरकाराला सुप्रिया सुळेंचा घराचा आहेर!

बीडमधल्या परळीत स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांतला आरोपी सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी 26 दिवस फरार राहणं हे राज्य सरकारचं अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय....

Jun 19, 2012, 08:23 PM IST

खा. सुप्रिया सुळे अडचणीत

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळलेत. तसेच सुळे यांच्या सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कागदपत्रांचा शोध घेण्यासंदर्भात न्यायालयानं सिंगापूरच्या दूतावासाला विनंती पत्र पाठवलं आहे. त्यामुळे सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे.

Feb 3, 2012, 08:27 AM IST

जिल्हापरिषदेची धांदल, राष्ट्रवादीत बांदल

मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Jan 27, 2012, 10:11 PM IST

पाकिस्तानात शत्रुघ्न सिन्हा भेटले बहिणीला

अभिनेता आणि भाजपचे राज्यसभा सदस्य शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी जेन जिया या आपल्या मानलेल्या बहिणीची हृद्य भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघेही अत्यंत भावुक झाले होते.

Jan 19, 2012, 01:39 PM IST

सुप्रिया सुळेंचा सेनेच्या भूमिकेला पाठिंबा

मला नाही वाटतं की माझ्या देशाचे पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत यावे, शिवसेनेच्या मताशी आपण सहमत असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत लोकपालवरील चर्चेदरम्यान व्यक्त केले. कदाचित माझ्या पक्षाला माझी भूमिका मान्य नसेल, पण पंतप्रधानपद लोकपाल कक्षेच्या बाहेर असावं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

Dec 27, 2011, 09:39 PM IST

सुप्रिया सुळे अडचणीत दुहेरी नागरिकत्वामुळे!

दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या नागरिकत्वाबाबत आक्षेप घेत अपक्ष उमेदवारानं याचिका दाखल केली आहे.

Dec 9, 2011, 05:16 PM IST

सुप्रिया सुळे 'मातोश्री'वर....

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने महाराष्ट्रातील नेते एकत्र झाल्याचे दिसून आले. कारण की, या हल्ल्याचा तीव्र निषेध साऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी केला, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या हल्ल्याविरूद्ध एल्गार करीत मराठी माणसाला पुन्हा एकदा साद घातली आहे.

Nov 27, 2011, 01:49 PM IST