सोने

सोने दरात पुन्हा घसरण

सोने सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. पुन्हा एकदा सोने दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Mar 9, 2016, 03:01 PM IST

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.

Feb 23, 2016, 05:32 PM IST

सोनंही घसरलं, चांदीही स्वस्त

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात झालेली वाढ आज मात्र काही प्रमाणात ओसरली आहे. शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले होते. आता मात्र शेअर बाजार स्थिरावला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

Feb 15, 2016, 10:21 PM IST

पायात सोनं का घालत नाहीत?

हिंदू धर्मात अनेक परंपरा आहेत. भारतात विविध धर्माचे लोक राहत असल्याने प्रत्येक धर्माच्या चालीरिती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. हिंदू धर्मात तुम्हाला माहीत आहे का पायात सोनं का घातलं जात नाही ते?

Feb 4, 2016, 10:15 AM IST

सोने-चांदी यांच्या दरात झाली घसरण, पाहा काय आहे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असल्याने  आणि मागणीत घट झाल्याने सोने-चांदी यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. दिल्लीत सोने बाजारात सलग तीन दिवसांच्या मजबुतीनंतर ८५ रुपयांनी सोने दरात घसरण झाली. तर चांदीच्या दरात ३५० रुपयांनी घट झाली.

Jan 29, 2016, 06:53 PM IST

विक्रमगड येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, २५ तोळे सोने लुटले

 जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे उपसरचिटणीस मनोहर भानुशाली यांच्या घरी काल रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. 

Jan 14, 2016, 09:18 AM IST

सोने, चांदी झाले स्वस्त

दागिने विक्रत्यांची घटलेली मागणी आणि परदेशी बाजारातील कमजोर पाठिंबा यामुळे राजधानी दिल्ली सोन्याचे भाव गेल्या दोन महिन्यातील खालच्या स्तरावर आहे. सोन्यात २०० रुपयांची घट आली आहे. 

Jan 12, 2016, 07:26 PM IST

सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा

जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशीही सोने दरात घसरण झाली.

Dec 16, 2015, 02:21 PM IST

खुशखबर! सोने आणि चांदीचे दर घसरले

जागतिक बाजारातील काही कारणांमुळे आणि सराफा बाजारातून सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोमवारी सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळायली. तर चांदीचे दरही घसरले. 

Dec 14, 2015, 10:59 PM IST

सोन्याच्या दरात वाढ

सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात शनिवारी वाढ पाहायला मिळाली. लग्नसराईच्या मोसमामुळे मागणीत वाढ होऊ लागल्याने स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या दरात शनिवारी ४४० रुपयांची वाढ होत ते पुन्हा एकदा प्रति १० ग्रॅमसाठी २६ हजार रुपयांवर येऊन ठेपले. चांदीच्या किंमतीततही ८५० रुपयांची वाढ होत ती प्रति किलो ३४ हजार ९५० रुपये झाली. 

Dec 6, 2015, 01:25 PM IST

सोने आणखी स्वस्त होणार

सोने खरेदीसाठी निघाला आहात? तर आणखी थोडे दिवस थांबा. कारण सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घटत्या दराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत सोने २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे. 

Dec 4, 2015, 01:32 PM IST

सोने-चांदी पुन्हा झालेय स्वस्त

जागतिक बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या खरेदीत घट झाल्याने याचा परिणाम पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमतीवर झालाय. 

Nov 28, 2015, 02:37 PM IST

सोने खरेदीचे प्रमाण घटले

ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यांमध्ये सणवार, लग्नसोहळ्यांचे प्रमाण अधिक असते. यादरम्यान सोने-चांदी खरेदीकडेही ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र यंदाच्या वर्षी लग्नसोहळ्यांच्या मोसमातही खरेदीचे प्रमाण घटलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळाचा परिणाम सोने-चांदीच्या खरेदीवर होतोय.

Nov 27, 2015, 02:58 PM IST

ऐन लग्नसराईच्या मोसमात सोने झालेय स्वस्त

सणसमारंभ, लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव नेहमीच चढे राहतात मात्र यंदाच्या वर्षी जागतिक मंदी आणि सोन्याच्या खरेदीतील घट या दोन्ही गोष्टींच्या परिणामामुळे लग्नसराईच्या मोसमात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरु आहे. 

Nov 22, 2015, 10:35 AM IST