नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या खरेदीत घट झाल्याने याचा परिणाम पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमतीवर झालाय.
तुलसीविवाह पार पडल्याने लग्नमोसम सुरु झालाय. मात्र सोनेखरेदीतील घटीमुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतायत. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतिग्रॅमसाठी २५ हजार ८१० रुपये इतके होते. तर चांदीच्या दरातही १५० रुपयांची घसरण झाल्याने प्रतिकिलो चांदीचे दर ३४, २५० इतके होते.
जागतिक बाजारात मंदी असण्यासोबतच सोने-चांदीखरेदीचे प्रमाण कमी झाल्यामुळे दर घटतायत. सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.४ टक्के घट होत ते १०६८.३६ डॉलर इतके होते. तर लंडनमध्ये ०.३८ टक्क्यांची घट होत ते १०६७.५० डॉलर होते.
मुंबईत काय आहे दर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.