anna hazare

लोकपाल : अण्णांचे पुन्हा जंतरमंतर

सक्षम लोकपाल विधेयक सरकारला मंजूर करावे लागेल. ते सकरारचे कर्तव्य आहे, असे टीम अण्णांच्या सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या. दरम्यान लोकपालबाबत सरकारची उदासिनदा दिसून येत आहे. त्यामुळे मला पुन्हा दिल्लीत जंतर मंतरवर उपोषण करावे लागेल, अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

Mar 23, 2012, 04:44 PM IST

राळेगणसिद्धीच्या सरपंचाची माघार!

राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारींनी माघार घेतलीय अंतर्गत वादामुळे त्यांनी माघार घेतलीय. मापारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार होते. मात्र तालुक्यातल्या काही जणांचा मापारींच्या उमेदवारीला विरोध होता. त्यातूनच मापारींनी माघार घेतलीय.

Jan 31, 2012, 11:45 AM IST

अण्णा हजारेंना 'भारतरत्न'?

सध्या तब्येत ठीक नसल्याने २०१२च्या निवडणुकांऐवजी आता २०१४च्या निवडणुकांमध्ये सरकारविरोधी प्रचार करणार असल्याचा एल्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.

Jan 26, 2012, 11:14 PM IST

नाशिकमध्ये अण्णांच्या स्वयंसेवकांचं प्रबोधन

अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काही ठिकाणी थेट निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. तर नाशकात त्यांनी प्रबोधन आणि प्रचाराचं काम हाती घेतलं आहे.

Jan 25, 2012, 10:30 PM IST

अण्णांचा सल्ला, भ्रष्टाचा-यांना थप्पड मारा!

प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराची किड वाढत आहे. हा भ्रष्टाचार पाहून लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे. त्यामुळे भ्रष्टाचा-यांना थप्पड मारा, असा सल्ला भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

Jan 25, 2012, 01:33 PM IST

सरकारने देशाची फसवणूक केली- अण्णा हजारे

मुंबई लोकपाल आंदोलनाचा फज्जा उडाल्यानंतर पहिल्यांदाच मौन सोडत अण्णा हजारेंनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं. या पत्रात अण्णा यांनी सरकारने संसदेत कमकुत लोकपाल विधेयक सादर करुन लोकांची फसवणूक केल्याचं म्हटलं आहे

Jan 22, 2012, 10:58 PM IST

टीम अण्णांचे प्रचार अभियान सुरू

टीम अण्णा पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अभियानात उतरली आहे. आजपासून प्रचार अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा काय प्रभाव दिसून येतो याकडे लक्ष लागले आहे.

Jan 21, 2012, 01:08 PM IST

'बाबा-अण्णा' प्रचारासाठी एकत्र

भ्रष्टाचारविरोधातल्या लढाईत योग गुरू बाबा रामदेव आणि टीम अण्णा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. २१ जानेवारीपासून टीम अण्णा आणि बाबा रामदेव एकत्रितपणे प्रचार सुरू करतील.

Jan 18, 2012, 02:01 PM IST

अण्णा हजारे सचिनपेक्षा जास्त विश्वसनीय...

देशातली प्रमुख व्यक्तिमत्व ब्रँड आहेत असं गृहित धरून त्यांना विश्वासार्हतेच्या निकषावर तपासलं तर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रथम स्थान प्राप्त करतात.

Jan 17, 2012, 05:28 PM IST

टीम अण्णा काँग्रेसला करणार नाही टार्गेट

अण्णा हजारेंनी आंदोलनाला झपाट्याने कमी होणार लोकांचा पाठिंबा आणि मागील चुकांपासून बोध घेत जाहीर केलं आहे कि टीम अण्णा पाच राज्यांमध्ये काँग्रेस सरकारला लक्ष्य करणार नाही. टीम अण्णा विधानसभा निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये फक्त सशक्त लोकपाल विधेयकासाठी मोहीम हाती घेणार आहे. लोकांमध्ये लोकपाल विधेयकासाठी जागृती घडवून आणण्यासाठी टीम अण्णा पाच राज्यांमध्ये दौरा करणार आहे.

Jan 10, 2012, 10:16 PM IST

राळेगण ते झेडपी व्हाया राष्ट्रवादी

राळेगण सिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मापारींना राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे.

Jan 9, 2012, 02:49 PM IST

अण्णा हजारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना आज डिस्चार्ज देण्यात आला. अण्णांनी व्यायाम सुरु केला असून त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती अण्णांवर उपचार करणारे डॉक्टर के.एच.संचेती यांनी दिली आहे

Jan 8, 2012, 11:33 AM IST

अण्णांना रविवारी मिळणार डिस्चार्ज

३१ डिसेंबरच्या रात्री अण्णांची तब्येत बिघडल्यानं त्यांना पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. अण्णांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यानं त्यांची तब्येत आता सुधारली आहे.

Jan 6, 2012, 11:01 PM IST

टीम अण्णा गोंधळात

अण्णा हजारे छातीच्या इन्फेक्शनने आजारी पडल्याने त्यांना सक्तीची विश्रांती सांगण्यात आलीये. याचाच परिणाम निवडणुकीचं धुमशान सुरू होण्याआधीच टीम अण्णा गोंधळलेल्या अवस्थेत सापडली आहे.

Jan 6, 2012, 04:25 PM IST

अण्णा आजारी, बैठक रद्द

अण्णा हजारे आजारी असल्याने आजची ही बैठक रद्द करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे.

Jan 2, 2012, 08:50 PM IST