anna hazare

फोन टॅप होत असल्याचा अण्णांचा खळबळजनक आरोप

टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचे खळबळजनक आरोप केलाय.जनलोकपालाच्या मुद्यावर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अण्णांना सोशल नेटवर्किंग साईटद्वारे जगभरातल्या तरुणांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळं तरुण पिढीशी नाळ जोडण्यासाठी अण्णांना ब्लॉग महत्त्वाचा आहे.

Nov 6, 2011, 05:45 AM IST

अण्णांना नोटीस

ट्रस्टमधील निधीचा गैरव्यवहार झाल्याच्या कथित आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नोटीस पाठविली आहे.

Nov 5, 2011, 01:28 PM IST

अण्णांनी दाखविला अविश्वास- राजू परुळेकर

अण्णांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत माझ्यावर अविश्वास दाखवल्यामुळे मी नाराज झाल्याची प्रतिक्रिया लेखक, पत्रकार राजू परुळेकर यांनी ब्लॉगवर व्यक्त केल्याचे समजते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी दिल्लीत राजघाटावर मौन सोडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता.

Nov 5, 2011, 09:55 AM IST

भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच - अण्णा

लोकपाल कायद्याचे तुकडे करत असल्याने सशक्त जनलोकपाल आणण्यासाठी आंदोलन सुरूच राहील, असं अण्णा हजारेंनी आज पहिल्यांदाच संवाद साधताना सांगितलं.

Nov 4, 2011, 10:25 AM IST

अण्णांनी १९ दिवसांनी मौन सोडले

अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजघाटावर पोहचले. यावेळी अण्णांनी मौन सोडले.

Nov 4, 2011, 03:09 AM IST

अण्णा उद्या दिल्लीत

अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.

Nov 3, 2011, 05:59 AM IST

अण्णांचा काँग्रेसविरोध मावळला!

हिसारमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचार करण्यावरून झालेले मतभेद आणि टीकेनंतर अण्णा हजारेंनी पाच राज्यात होणा-या अगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचं नाव न घेता प्रचार करण्याचं ठरवलंय.

Nov 1, 2011, 09:23 AM IST

अण्णांचं सरकारला अल्टिमेटम

येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. अण्णांनी पंतप्रधानांना या अर्थाचे पत्र लिहून त्यांना अल्टिमेटम दिलं आहे.

Nov 1, 2011, 05:45 AM IST

अण्णा मौनव्रत सोडणार

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून सुरू केले मौनव्रत सोडणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.

Oct 31, 2011, 11:40 AM IST

चांडाळ चौकडीचा डाव, अण्णांचा केंद्रावर घाव

'टीम अण्णा'वर होणाऱ्या हल्ल्यास केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेली 'चांडाळ चौकडी' जबाबदार असल्याचा घणाघाती घाव ज्येष्‍ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून केले आहे.

Oct 25, 2011, 09:28 AM IST

अग्निवेशांना हवं अण्णांच्या आंदोलनाचं ऑडिट

दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या खर्चात मोठी फेरफार झाली असल्याचा दावा त्यांनी केला असून, टीम अण्णांनी आंदोलनाचा खर्च दाखवावा असे अव्हान स्वामी अग्निवेश यांनी दिले आहे. आंदोलनातला बराच पैसा केजरीवाल यांच्या ट्रस्टकडे गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

Oct 23, 2011, 09:44 AM IST

अण्णांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी

बाबा आढाव

अण्णांच्या संदर्भात रोज नव्या नव्या स्वरुपात मांडणी होत आहे. अण्णांचे नेमकेपण काय आहे त्याचा शोध घेण्यात येतो. सध्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी पाहता तर त्यात गैर काहीच नाही.

Oct 22, 2011, 03:15 PM IST

अण्णा, झेड सुरक्षा घ्या ना! जीवाला धोका

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपालाची मागणी करणा-या अण्णा हजारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचरांच्या हाती आली आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.

Oct 19, 2011, 10:42 AM IST

काश्‍मीर हे भारताचं अविभाज्य अंग - अण्णा

प्रशांत भूषण यांनी काश्‍मीरप्रश्‍नी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून, काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, असे अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सांगितले.

Oct 14, 2011, 11:37 AM IST

आमच्यात 'फूट' सब 'झूठ' - अण्णा

टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याचा खळबळजनक खुलासा न्यूयॉर्क टाईम्सनं केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी पुकारलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्सनं घेतलेली अण्णांची मुलाखत नुकताच प्रसिद्ध झाली.

Oct 6, 2011, 01:08 PM IST