asia

पाकिस्तानात उष्णतेची लाट, १३६ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे, यात १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवार  हा दिवस सर्वांत उष्णतेचा ठरला. 

Jun 22, 2015, 09:29 PM IST

'भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका'

नेपाळच्या अधिकाऱ्यांनी "भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका‘ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर जगभरातून मदत येत आहे, तेव्हा नेपाळच्या नागरिकांना जुने कपडे देखिल पाठवण्यात आले आहेत. यावर नेपाळमधील भूकंपातील पीडितांसाठी मदत म्हणून जुने कपडे पाठवू नयेत असे आवाहन नेपाळच्या वतीने करण्यात आले आहे.

May 5, 2015, 02:08 PM IST

जपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास

जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.

Apr 21, 2015, 05:21 PM IST

इसिसकडून महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार

 इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या याझिदी महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या आठवड्यामध्ये काही महिलांची सुटका झाली असून या महिलांनी याबाबतची माहिती दिली.

Apr 10, 2015, 08:57 PM IST

सायबर युद्धासाठी चीनची मोठी तयारी

अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सायबर युद्धनीती कार्यक्रमामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे, अमेरिकेच्या उच्च दर्जाच्या लष्करी सायबर क्षमतेशी स्पर्धा करण्यासाठी ही गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Apr 2, 2015, 09:17 PM IST

शिक्षकांना बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण

पेशावरमधील मिलिट्री स्कूलवर गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता वायव्य पाकिस्तानमधील शिक्षकांना बंदूक बाळगण्याचे आणि चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Jan 28, 2015, 02:01 PM IST

भारतात इंटरनेटचा स्पीड सर्वात स्लोः अकामाई

भारतात इंटरनेट स्पीड जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असे एका अहवालात समोर आले आहे.  इंटरनेट कन्टेंट डिलिवरी नेटवर्क म्हणजेच अकामाईने नुकताच आपला तिमाही अहवाल प्रसिद्ध केला त्यात भारतात इंटरनेट कनेक्शनचा सरासरी स्पीड १.७ एमबीपीएस आहे. भारत यात जगात ११८ व्या रँकिंगवर असून थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनामपेक्षाही मागे आहे.

Jul 2, 2014, 05:53 PM IST

भारतासह आशियातील चार देशांना बर्डफ्लूचा धोका

भारतात पुन्हा बर्डफ्लूचा धोका उद्धभवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. आशियातील पाच देशांना हा धोका पोहोचू शकतो. याबाबत काही तज्ज्ञांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे.

Jun 19, 2014, 03:27 PM IST

भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना

भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी रविवारी सकाळी बांगलादेशला रवाना झाला. स्पर्धची सुरुवात २५ फ्रेबुवारीपासून होणार आहे.

Feb 23, 2014, 02:20 PM IST

आशिया खंड 'टिवटिव' करण्यातही पुढेच

आशिया खंडाने ट्विट्स पोस्ट करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. अमेरिकेतून सध्या सर्वाधिक ट्विट्स पोस्ट केल्या जातात. मात्र गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतून ट्विट्स पोस्ट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Jul 12, 2012, 06:41 PM IST